महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar Resign : शरद पवारांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार राजकारणातून निवृत्त? - Prime Minister Narendra Modi retire

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नुकतेच सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचा हाच काय तो अर्थ असा अंदाज लावला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातच काय केंद्रातही मोठा राजकीय भूकंप येईल असे, वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या राजीनाम्याकडे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानेही पाहिले जात आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : May 2, 2023, 10:03 PM IST

मुंबई :सुप्रिया सुळे यांनी १८ एप्रिल रोजी राजकारणात दोन मोठे भूकंप होतील असे म्हटले होते. येत्या १५ दिवसात एक भूकंप महाराष्ट्रात होईल. तर दुसरा भूकंप दिल्लीत होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. आज शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पवारांच्या या घोषणेबाबत माहिती होती असेच दिसते. कारण त्यांनीच याबाबतचे सूतोवाच गेल्या महिन्यात केले होते. मात्र थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार सोडतील याची जराशीही कल्पना कुणाला त्यावेळी आल्याचे कोणत्याच माध्यमातील वृत्तवरुन दिसून येत आहे.

राज्यात मोठा भूकंप : सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी सोडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. कारणही तसेच होते. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांच्यामागे जा आणि त्यांनाच विचारा असे सुप्रिया म्हणाल्या होत्या. त्यातच भाजपच्या नेत्यांचीही अनेक वक्तव्ये अजित पवार त्यांच्याकडे येणार अशी येत होती. याच गदारोळात सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे कुणालाच कळले नाही. तसेच थेट शरद पवारच राजकीय निवृत्तीची घोषणा करुन मोठा भूकंप घडवतील असे कोणत्याही राजकीय विश्लेषकाने मांडले नाही. त्यामुळे एका अर्थाने सु्प्रिया सुळे यांना आजच्या राजकीय निर्णयाची माहिती होती असेच म्हणण्यास वाव आहे. त्यानुसारच शरद पवार यांच्या आजच्या घोषणेकडे पाहिले जात आहे.

राजकारणात दुसरा भूकंप काय होणार?: राज्याच्या राजकारणातील शरद पवारांची निवृत्ती हा जर पहिला राजकीय भूकंप मानला तर केंद्रिय राजकारणात दुसरा भूकंप काय होणार हा प्रश्न आता बाकी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा दिशानिर्दश कुणाकडे आहे, याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. आजची घडामोडी पाहिली तर पवार यांनी वयाचा विचार करुन नवीन नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी पक्षाध्यक्षपद सोडले आहे. मग राष्ट्रीय राजकारणात काय घडू शकते याचे राजकीय धुरीण आता विचार करू लागले आहेत.

नरेंद्र मोदीची राजकीय निवृत्ती? : केंद्रिय राजकारणाचा, आजच्या शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या संदर्भाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदीच राजकारणातून निवृत्त होणार का हा प्रश्न पहिल्यांदा समोर येतो. कारण वयाची ७५ वर्षे पार केल्यानंतर भारतीय जनता पक्षात नेते राजकीय निवृत्ती घेतात असा प्रघात आहे. नरेंद्र मोदीही वयाची पंचाहत्तरी पार करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष नव्या नेतृत्वाला संधी देणार का, त्याची घोषणा कदाचित होणार का. अशा अटकळींना आता जोर येण्याची शक्यता आहे.

दुसरा राष्ट्रीय पातळीवरील भूकंप कोणता? : नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षावरील पकड ही अत्यंत मजबूत आहे. सध्या ते पंतप्रधानपदी विराजमान आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे तत्वाशी पक्के आहेत, असे मानण्यात येते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी भाकित केलेला दुसरा राष्ट्रीय पातळीवरील भूकंप काय असेल याचा केवळ विचारच आता आपण करू शकतो. मात्र, काहीतरी राष्ट्रीय राजकारणात काहीतरी नक्कीच खळबळजनक ठरणार हे मात्र नक्कीच.

हेही वाचा - Sharad Pawar Political Heir: शरद पवारांनी वारसदार ठरवले; दिल्ली सुप्रिया सुळे, राज्य अजित पवारांकडे?

ABOUT THE AUTHOR

...view details