मुंबई- पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आमच्या आयुष्याची कमाई परत मिळाली नाही तर आमच्याकडून उमेदवारांनी मतदानाची अपेक्षा करू नये, असा पवित्रा पीएमसी बँक ग्राहकांनी घेतला आहे. शहरातील दिवाणी न्यायालयात आज एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवा, सारंग वाधवा, यांच्यासह पीएमसी बँकेचे माजी संचालक वारीयम सिंग यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी २३ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे.
नो मनी नो वोट..! पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा न्यायालयासमोर ठिय्या - Civil Court mumbai PMC Bank News
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आमच्या आयुष्याची कमाई परत मिळाली नाही तर आमच्याकडून उमेदवारांनी मतदानाची अपेक्षा करू नये, असा पवित्रा पीएमसी बँक ग्राहकांनी घेतला आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यामुळे तणावाखाली आलेल्या दोन बँक ग्राहकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र अजून कुठलाही राजकारणी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची कमाई मिळणार नसेल तर आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नाही, असा इशारा बँक ग्राहकांनी सरकारला दिला आहे. पीएमसी बँक ग्राहकांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
हेही वाचा-मराठा-ब्राह्मण समाजांचे पुन्हा एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण