मुंबई:मनी लॉंडरिंग प्रकरणी (Money laundering case) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Chief Minister's cousin Shridhar Patankar) यांच्या विविध मालमत्तां ईडीने जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचा, अथवा त्यांच्या खात्याचा या प्रकरणात थेट संपर्क अथवा संबंध नसल्याने त्यांचा राजीनामा मागणार नाही अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांत दिली. मात्र श्रीधर पाटणकर हे प्रथम दर्शनी दोषी आढळत असून पी एम एल कायद्यांतर्गत त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा योग्य आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल असेही फडणवीस म्हणाले.पाटणकर प्रकरणातील अकाउंटंट नंदकिशोर चतुर्वेदी गेल्या काही महिन्यांपासून फरार आहेत. ईडी त्यांचा शोध घेत आहे.
Fadnavis On CM : मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही - देवेंद्र फडणवीस - मनी लॉंडरिंग प्रकरण
मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Chief Minister's cousin Shridhar Patankar) यांची ईडी मार्फत चौकशी (Inquiry via ED) सुरू आहे. त्यांच्या काही मालमत्तांना जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही, (Will not seek resignation of Chief Minister) अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी यांनी सारख्याच कंपन्यांमधून स्थानिक नेत्यांना पैसे दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. शेल कंपन्यांच्या मार्फत हा व्यवहार झाला असून यातून बरीच माहिती समोर येऊ शकते असेही फडणवीस म्हणाले. उत्तर प्रदेश मध्ये 25 तारखेला नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी योगी आदित्यनाथ यांनी आपल्याला निमंत्रण दिले आहे मात्र राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आपल्याला जाता येणार नाही असे त्यांना कळवल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गोव्यात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करत आहे. मात्र गोव्यातील सत्ता म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा प्रकार आहे. आमच पूर्ण लक्ष्य महाराष्ट्र असून एकदा दुधाने तोंड पोळल्यामुळे आता आम्ही फुंकून फुंकून पीत आहोत असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
हेही वाचा : Sanjay Raut On BJP : पैसे फक्त आमच्याकडेच आहेत का.. भाजपचे लोक भीक मागतायेत का? -राऊत