महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut's warning to BJP : राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला कायदेशीर मार्गाने हात घालणार - राऊत

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य (Rule of law in Maharashtra) आहे. केंद्रीय यंत्रणांप्रमाणे येथे सूड भावनेने कारवाई केल्या जात नाहीत. (Revenge action here Are not done) योग्‍यवेळी ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे. त्या राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला कायद्याने नक्कीच हात घातला जाईल, (will legally touch the collar of political criminals) असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजपला दिला.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Apr 1, 2022, 6:11 PM IST

मुंबई:राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये कोणतीही नाराजी नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे माझा माझ्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करतात, तेव्हा अशा अफवा विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत. त्या निरर्थक आहेत. आमच्या तीन पक्षांचे सरकार व्यवस्थित सुरू असून ते सुरू राहील. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार राष्ट्रवादीला मुख्यमंत्री तर शिवसेनेला गृहमंत्री हवे आहे, असे बोलत असतात. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले विरोधी पक्षनेते पद कोणाला हवे, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही याबाबत कधी काय बोललोय का? तुम्ही कशाला आमच्यात नाक खुपसता.मुख्यमंत्री - गृहमंत्री यांच्या भेटीनंतर राऊत मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आमचे तिन्ही पक्षांचे सरकार असून संपूर्ण कॅबिनेटचा एकमेकावर विश्वास आहे, असे स्पष्ट करताना राऊत यांनी शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद पाच वर्षे राहील भाजपच्या नेत्यांनी त्रास करून घेऊ नये, अशा कानपिचक्या ही राऊत यांनी दिल्या. राज्यात काही कारवायाबाबत पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष देत आहेत. राजकीय सुडा पोटी कोणावर कारवाई करणार नाही. हे कायद्याचे राज्य आणि सरकार आहे. कोणत्याही निरापराधावर कारवाई होणार नाही. परंतु योग्य वेळी कायदेशीर मार्गाने राजकीय गुन्हेगाराच्या कॉलरला हात घालू हे नक्की असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.
राज्यात गृहमंत्रीपद संजय राऊत यांना मिळालं तर, असा खोचक प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मी सक्रिय आहे असे हसत सांगत भाष्य करणे टाळले.

हेही वाचा : Charge Sheet Filed Against Pravin Raut : प्रवीण राऊत यांच्याविरोधात ईडीने केले दोषारोपत्र दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details