मुंबई -मुंबईमधील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांट सीसीटीव्ही लावून सुरक्षित केले जातील. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा -18 वर्षावरील नागरिकांचे मोफत लसीकरण करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
ऑक्सिजन प्लांटची सुरक्षा वाढवणार
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मुंबईमधील सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटच्या आजूबाजूचा परिसर बॅरिकेटिंग लावून सील केला जाईल. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवली जाईल, असे महापौरांनी सांगितले.