मुंबई -महाराष्ट्रातील अनेक मुले युक्रेनमध्ये अडकलेली आहेत. ( Indian Students in Ukrain ) गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. युक्रेनमधे अडकलेल्या मुलांचे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या मुलांना परत आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर ( MEA S Jaishankar ) यांना अडकलेल्या मुलांबाबत यादी ट्विट केली आहे. तसेच त्यांच्याशी चर्चा ही केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule on Indian Students in Ukrain ) यांनी दिली. मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ( Supriya Sule Talked with Media ) कोरोना काळातही परराष्ट्रमंत्र्यांनी परदेशात अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी मोठी मदत केली होती. याबाबत संसदेत देखील आपण परराष्ट्रमंत्री यांचे आभार मानले होते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या तब्येतीची माहिती मिळाली -
मंत्री नवाब मलिक यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबीयांशी देखील चर्चा केली. तसेच नवाब मलिक यांची तब्येत नेमकी आता कशी आहे याबाबत इडीकडून माहिती मिळावी यासाठी मलिकांच्या वकीलांशी देखील बोलणं सुरू असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती ऐकून सर्वजन अस्वस्थ आहोत. इडीकडून त्यांच्या तब्येती बाबत टप्प्याटप्प्याने माहिती मिळावी किंवा त्यांची आतापर्यंत त्यांच्या कोणत्या टेस्ट करण्यात आल्या याबाबत लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी वकिलांशी चर्चा केली जात असल्याचे त्या म्हणाल्या.