महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Somaiya On Malik : महाराष्ट्राला घोटाळे मुक्त करणार - किरीट सोमय्या - भाजप नेते किरीट सोमय्या

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांची ईडी कडून आठ तास चौकशी करण्यात आली. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Dawood Ibrahim Money Laundering Case) ही चौकशी झाल्याचे समजते याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आणि सांगितले की ठाकरे सरकारच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही महाराष्ट्र घोटाळे मुक्त करणार.

Kirit Somayya
किरीट सोमय्या

By

Published : Feb 23, 2022, 5:07 PM IST

मुंबई:नवाब मलिक यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की, यापूर्वी भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आता मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तर यापुढील नंबर हा मंत्री अनिल परब यांचा असणार आहे. उद्धव ठाकरे घोटाळेबाज सरकार आहे व या सरकारमधील सर्व घोटाळे उघड केल्याशिवाय मी राहणार नाही.

किरीट सोमय्या


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ही समन्स पाठवले होते व त्या अनुषंगाने आज त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुरू असताना नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते व त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजीही केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details