मुंबई - राज्याच्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेल्या बदल्यांसदर्भात गृह सचिवांनी पोलीस अधिकाऱ्यांची बदलीसदंर्भात सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदली मध्ये होणारे सगळे गैरव्यवहार संदर्भात एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीच कारवाई न करता या सगळ्या पोलिसांच्या बदल्यांच्या मागे असणाऱ्या लोकांचे रक्षण केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही कारवाई नाही -
मी मुख्यमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात एक बातमी समोर आली होती. त्यावर आम्ही लक्ष ठेवत या सगळ्या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश इंटेलिजन्स युनिटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले होते. रश्मी शुक्ला यांनी या संदर्भात सगळी माहिती घेत संपूर्ण अहवाल तयार केला. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीने नंतर कॉल रेकॉर्डींग केले जावू लागले. त्यात काही मोठे अधिकारी, राजकीय लोक बाहेर आले. यानंतर हा अहवाल त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन डीजी सुबोध जैस्वाल यांना सुपूर्द केला होता. जैस्वाल यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही आणि तो अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवून दिला. २५-०८-२०२० त्यानंतर तो अहवाल मुख्य सचिव सिताराम कुंटेना दिला गेला होता, असे दावा फडणवीस यांनी केला.