मुंबई -राज्यातील महिला आणि बाल विकासासाठी राज्य सरकारच्यावतीने अनेक प्रयत्न केले जाणार आहेत. या राज्याचे नवनिर्वाचित मंत्री मंगल प्रभात लोढा ( State Minister Mangal Prabhat Lodha ) यांनी विभागाचा पूर्ण आढावा घेतला असून विभागामध्ये कोणकोणत्या नव्या योजना राबवता ( Schemes of State Govt for women empowerment ) येतील याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.
गल्लीबोळात रुग्णवाहिकांची सोय - कोणत्याही घरी बाळाच्या आगमनाने होणारा आनंद अवर्णनीय असतो. मात्र जेव्हा बालकांना आणि त्याच्या आईला रुग्णालयातून घरी आणले जाते तेव्हा घेऊन येणारी रुग्णवाहिका गल्लीबोळात आल्यानंतर लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण रुग्णवाहिका शक्यतो गंभीर रुग्णांशी अथवा अप्रिय घटनेशी संबंधित मानली जाते. रुग्णवाहिकेकडे बघण्याचा सर्वसामान्यपणे असाच दृष्टिकोन असल्यामुळे महिला आणि बाल विकास विभागाने आता खिलखीलाहट ही रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ( Ambulance facility in lanes )सांगितले. या रुग्णवाहिकेचा सायरन हा लहान मुलांच्या हसण्याच्या आवाजाचा असेल. तसेच या रुग्णवाहिकेची डिझाईनही लहान मुलांच्या स्वागतासाठी अथवा त्यांना आवडेल अशी करण्यात येणार आहे त्यामुळे अशा रुग्णवाहिका आल्यानंतर लोक त्यांचे आनंदाने स्वागत करतील. त्यामुळे सध्या तरी मुंबई उपनगरातील लहान मुलांच्या एक दोन रुग्णालयांची संलग्न अशा रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. असेही लोढा यांनी सांगितले.
बचत गटांसाठी दीपावली बाजार -राज्यातील बचत गटांच्या उत्पादनांना अधिक संधी मिळावी त्यांना जास्तीत जास्त विक्रीची संधी मिळावी. या माध्यमातून महिला अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी राज्य सरकारतर्फे दीपावलीच्या निमित्त दीपावली बाजार सुरू करण्यात येणार ( Diwali bazaar for self help groups ) आहे. या बाजारांमध्ये महिला बचत गटामार्फत तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर पासून मुंबईत हा बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.