मुंबई : जुलै 2023 मध्ये पुण्यामधील ही घटना आहे. नवऱ्याच्या मित्रांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या मित्रांना तिच्या नवऱ्याने मदत केल्याची तिची तक्रार आहे. या संदर्भात पुण्यातील समर्थ पोलीस ठाणे या ठिकाणी एफआयआर दाखल केली होता. त्या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक एक नवरा आणि आरोपी क्रमांक दोन व आरोपी क्रमांक तीन मध्ये नवऱ्याचे मित्र आहेत. त्यांनीच हे षड्यंत्र आखले असे तिचे म्हणणे होते.
वेळेत ती चौकशी केली पाहिजे: या संदर्भात न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे यांनी पोलिसांना या खटल्याच्या निमित्ताने सज्जड दम दिला. एक विवाहित पत्नी आपल्या नवऱ्याच्या मित्रांबरोबर आणि आपल्या नवऱ्याबाबतच जेव्हा असा संशय घेते. त्यावेळेला त्या खटल्याची कायद्यानुसार सर्व चौकशी आणि तपासणी नीटपणे पार पाडली पाहिजे.
याचिका निकाली काढली : आज झालेल्या सुनावणीच्या वेळी महिलेचा नवरा आरोपी क्रमांक एक हा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र आधारे पोलिसांनी सादर केले. आरोपी क्रमांक दोन आरोपी क्रमांक तीन हे नवऱ्याचे मित्र यांना अटक केली असल्याचे कागदपत्र सहित तथ्य न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने याबाबत पोलिसांच्या तपासाची दिशा यावर आमचे लक्ष असल्याचे म्हणत ही याचिका निकाली काढली. तसेच महिलेला जर या तपासाबाबत संशय वाटला किंवा तपासात काही चूक आढळली तर ती पुन्हा न्यायालयात मागू शकते, असे म्हणत ही याचिका निकाली काढली. पीडित महिलेच्या संदर्भात वकील वैभव कुलकर्णी आणि मृणाल सुरणा यांनी बाजू मांडली.