मुंबई- गजबजलेल्या सायन परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या दिनेश नायर (37) या व्यक्तीची त्याच्या पत्नी व साडूकडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामागे कौटुंबिक कारण अस्लयाची माहिती आहे.
सायन परिसरात भररस्त्यात पत्नी व साडूकडून पतीचा खून करण्याचा प्रयत्न - साडू
कौटुंबिक वादातून गेल्या काही दिवसांपासून दिनेश रामचंद्र नायर व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते.
कौटुंबिक वादातून गेल्या काही दिवसांपासून दिनेश रामचंद्र नायर व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. या दरम्यान बुधवारी सायन परिसरातील गुरू तेग बहादूर नगर येथे आर बी कॉलनीजवळ दिनेश नायर याला त्याच्या पत्नीने गाठून दिनेशच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकली. या वेळेस त्याच्या पत्नीसोबत असलेला दिनेशच्या साडूने दिनेशच्या गळ्यावर चाकू फिरवून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दिनेशला सायन पोलिसांनी तात्काळ सायन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.