मुंबई:भारतीय संस्कृतीत पती पत्नीच्या नात्याला विशेष महत्व आहे पतीचा दर्जा हा परमेश्वराचा मानला गेला आहे. जन्मा जन्माचे नाते सांगत विश्वास हा या नात्याचा पाया असतो परंतु जेव्हा हा पाया ढासळतो तेव्हा नात्याची इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळते. अशी काहीशी घटना घडली मुंबईतील गोवंडी भागात घडली जीथे एका पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीची हत्या केली.
Wife killed husband : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या - प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
मुंबईतील गोवंडीतील बैगनवाडी परिसरात 32 वर्षीय पत्नीने प्रियकराच्या मदतीने 34 वर्षीय पतीची हत्या केली (wife killed Husband with boyfriend help) आहे. शिवाजी नगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे महिला आरोपीचे नाव नजीरा असून तिच्या प्रियकराचे नाव सदर आलम आहे. इरफान खान असे मृत व्यक्तीच्या नाव आहे.
पत्नीने केली पतीची हत्या
32 वर्षीय नजीराने प्रियकर सदर आलम याच्या मदतीने इरफान खान या 34 वर्षीय पतीची हत्या केली. शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसारदोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.