महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोटाबंदीने मोठा फटका बसला, विडी कामगारांनी मांडल्या समस्या - kurla

हजार विड्या वळल्यानंतर या महिलांना ३०० रुपये मिळतात. हे पैसे अगदीच तुटपुंजे आहेत. पण, हे काम मोठ्या जिकीरीचे आहे. तसेच, किचकट आहे. आधीच हा व्यवसाय संकटात होता. त्यातच सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे विडी व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे या महिला कामगारांचे मत आहे.

विडी कामगार महिला

By

Published : Apr 15, 2019, 11:35 AM IST

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. मात्र, मुंबईतील कुर्ला भागातील विडी वळणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणीही फिरकला नाही. अशी खंत महिला व्यक्त करत आहेत. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने या विडी कामगार महिलांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपल्या समस्यांचा पाढा 'ईटीव्ही भारत'पुढे वाचला.

विडी कामगार महिलांनी आपल्या समस्या मांडल्या

मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कुर्ला पश्चिमलाल संभाजी चौक परिसरात विडी कामगार महिलांची वसाहत आहेत. आंध्रप्रदेशमधून साठ वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेली ही कुटुंबे छोटीमोठी कामे करुन रोजीरोटी भागवतात. या घरातील महिला विड्या वळण्याचे काम करतात. या व्यवसायातून त्यांच्या घराला हातभार लागतो. पण, आता हा व्यवसायही डबघाईला आला आहे. अतिशय तुटपुंजी कमाई मिळत असताना सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

हजार विड्या वळल्यानंतर या महिलांना ३०० रुपये मिळतात. हे पैसे अगदीच तुटपुंजे आहेत. पण, हे काम मोठ्या जिकीरीचे आहे. तसेच, किचकट आहे. आधीच हा व्यवसाय संकटात होता. त्यातच सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे विडी व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे या महिला कामगारांचे मत आहे. पण, असे असूनही कुणी नेता त्यांच्या भेटीला आला नाही.


काय म्हणतात विडी कामगार
येथील अनुराधा देवसाने सांगतात, की मागील २५ वर्षांपासून मी विड्या वळते. ३०० रुपये मिळण्यासाठी हजार विड्या वळाव्या लागतात. त्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते. त्यामुळे हवा तसा मोबदला मिळत नाही. दुसऱ्या विडी कामगार प्रमिला म्हणतात, माझी आई, आजी सुद्धा हेच काम करायच्या. पण, नोटाबंदीने आमच्यावर संकट कोसळले. तर वरलक्ष्मी म्हणतात, वीस वर्षांपासून मी विडी वळते. या विड्या आम्हाला परळला जाऊन विकाव्या लागतात. त्यामुळे जवळच विक्री केंद्र व्हावे अशी आमची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details