मुंबई:महाराष्ट्र शासनाकडे जनतेचा तक्रारीचा आणि असंतोषाचा ओघ येऊ लागताच शासनाने 72 हजार मेगा भरती (72 thousand mega recruitment) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) शासनाला उलट सवाल केलेला आहे, की जर एवढी मोठी मेगा भरती करतात तर मग 13500 पदांच्या भरतीची परीक्षा रद्द का केली? (13500 posts recruitment exam cancelled) यामुळे त्यांनी आंदोलनाचा पुकारा केलेला आहे.
निराशेचे वातावरण:लाखो नोकऱ्या (Jobs) निर्माण करणारे राज्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्र राज्याबाहेर गेल्या काही महिन्यांमध्ये आहेत. त्यामुळे नोकरीसाठी राज्यातील लाखो तरुण तरुणी आणि कुटुंबीयांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण विभागामार्फत 2019 रोजी प्रकाशित केलेल्या जिल्हा परिषदातील सुमारे 13,514 पदासाठी राज्यातील २० लाख तरुण तरुणींनी अर्ज भरले होते. सर्व इच्छूक तरुण तरुणी गेल्या वर्षापासून परीक्षेची तयारी करत होते. अर्जापोटी रु. 5000/- ते रु.6000/- भरून गेल्या वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत असतानाच जिल्हा परिषदातील 13,514 रिक्त पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे बेरोजगार तरुण तरुणींमध्ये अत्यंत निराशेचे वातावरण पसरलेले आहे.