मुंबई :आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात. कारण प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. असेच काहीसे एक जुलैला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 1 जुलै या दिवशी संपूर्ण देशात डॉक्टर 'डे' म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा होतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने एक जुलैला विशेष दिवस म्हणून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. मागील दोन वर्षात ज्याप्रकारे कोरोनाने थैमान माजवले होते. त्यात अनेक लोकांनी आपले जीव गमविले होते. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे रुग्णसेवेचे व्रत पार पाडले होते. डॉक्टरांची रुग्णसेवा आणि समर्पण गौरवाच्या निमित्ताने एक जुलैला डॉक्टर 'डे' भारतात साजरा केला जातो. डॉक्टर 'डे' जगात मात्र वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात.
डॉक्टर 'डे'ला विशेष महत्त्व :देवानंतर आपण कोणाला महत्व देत असेल, तर ते डॉक्टरांना देतो. देवदूत म्हणून देखील डॉक्टरला संबोधले जाते. स्वतः अडचणीत असला तरी रुग्णाला योग्य उपचार देण्याचे कर्तव्य डॉक्टर पार पाडत असतो. अशा रुग्णाला पुन्हा जीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने डॉक्टर 'डे'ला विशेष महत्त्व आहे.
जन्मदिन पुण्यतिथी दिन सारखा :बिहार राज्यातील पाटणा येथे बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला होता. सुरुवातीच्या शिक्षण भारतात आणि नंतर शिक्षणासाठी इंग्लंड इथे पूर्ण केले होते. भारतात परतल्यानंतर वैद्यकीय सेवेतून मिळवलेली कमाई सर्व त्यांनी दान केली. स्वातंत्र्याच्या काळात मोफत रुग्णसेवा केली. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनानंतर डॉक्टर रॉय यांनी राजकारणात प्रवेश केला.उत्तम डॉक्टर आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. पश्चिम बंगालचे 14 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यू एक जुलै रोजी झाला होता.
चरक आणि सुश्रुत कॉम्बिनेशन असलेले डॉक्टर : आपल्या देशाला महान डॉक्टर बिधानचंद्र रॉय लाभले. त्यांच्या स्मरणार्थ देशभर डॉक्टर 'डे' साजरा केला जातो. त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जन्म आणि मृत्यू एकाच तारखेला झाला होता. स्मृतिपित्यर्थ त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने डॉक्टर 'डे' साजरा करतात.