महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Encounter Specialist Daya Nayak : दया नायकचा विषयच होता खोल; 'या' कारणामुळे आधी निलंबन अन् नंतर निर्दोष सुटका

गुंडांना धडकी बनवणारा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा, मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याने पोलीस खात्यात चर्चांचे वावडे उठले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आला होते. त्यानंतर दया नायक यांचे निलंबन देखील करण्यात आले आणि तुरुंगात देखील पाठवले होते. आता तपासात दया नायक निर्दोष सिद्ध झाले आहेत.

Encounter Specialist Daya Nayak
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक

By

Published : Apr 20, 2023, 3:23 PM IST

Updated : May 8, 2023, 2:26 PM IST

मुंबई:एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक हे अल्पावधीतच त्यांनी केलेल्या एन्काऊंटर मुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जेवढी प्रसिद्धी मिळवली होती ती त्यांच्यासाठी समस्या बनली. कर्नाटकातील त्यांच्या गावातील एका शाळेच्या उद्घाटनासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर दया नायक यांचे निलंबन देखील करण्यात आले आणि तुरुंगात देखील पाठवले होते. आता तपासात दया नायक निर्दोष सिद्ध झाले आहेत.

दया नायक यांची निर्दोष सुटका

पैसे उकळल्याचा केला आरोप: दया नायक यांच्याकडून त्यांच्या कर्नाटकातील गावातील एका शाळेच्या उद्घाटनासाठी अनेक ख्यातनाम व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. ज्यामध्ये स्वतः अमिताभ बच्चन यांचाही सहभाग होता. येथूनच दया नायक यांचे वाईट दिवसही सुरू झाले होते. दया नायक यांच्यावर पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोपही आहे. दया नायक यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात दया नायक निर्दोष सिद्ध झाले आहेत.



दया नायक पुन्हा निर्दोष सिद्ध झाले: 2006 मध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर दया नायक पुन्हा निर्दोष सिद्ध झाले. 2010 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व MCOCA आरोप रद्द केले. दया नायक यांची २०१२ मध्ये पुन्हा मुंबई पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली होती.



आंबोली पोलिस स्टेशनमध्ये पोलीस इन्स्पेक्टर: दया नायक यांची पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती, परंतु नागपुरात रुजू न झाल्यामुळे त्यांना 2015 मध्ये निलंबन करण्यात आले होते. 2016 मध्ये दया नायक यांना पुन्हा मुंबई पोलिसात रुजू करण्यात आले आणि 2018 मध्ये त्यांना मुंबईतील आंबोली पोलिस स्टेशनमध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. वर्ष 2019 दया नायक यांची एटीएसमध्ये बदली झाली. मात्र, दया नायक यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध केले. राज्य सरकारने यांना त्या काळातील संपूर्ण पगार दिला असल्याची माहिती दया नायक यांनी दिली आहे.



शाळेचे उद्घाटन करण्यात आले:अनेक वादविवाद, आरोप-प्रत्यारोप आणि माध्यमांमध्ये सतत चर्चेत असलेले अधिकारी म्हणून दया नायक यांची कारकीर्द गाजली होती. यामुळे ते प्रसिद्धी माध्यमांसमोर येणे टाळतात. दया नायक यांनी 2000 साली आपल्या जन्मगावी शाळा सुरू केली होती. या शाळेचे उद्घाटन अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शाळेसाठी आर्थिक मदत केल्याची चर्चा आहे. त्यानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या सहाय्याने ही शाळा उघडण्यात आल्याचा आरोप दया नायक यांच्यावर करण्यात आला. यात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान ते निर्दोष आढळून आले.

दया नायक यांना निलंबित: 2006 मध्ये माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्या तक्रारीनंतर नायक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. नंतर दया नायक यांना जवळपास साडेसहा वर्ष निलंबित करण्यात आले. कारण त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 2009 मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक एस एस विर्क यांनी दया नायक यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने त्यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांना सर्व आरोपांमधून मुक्तता करण्यात आली. सुप्रीम कोर्टानेही 2010 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले. त्यानंतर जून 2012 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले.


2016 मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू : दोन वर्ष मुंबई शहरात विविध विभागात काम केल्यानंतर 2014 मध्ये दया नायक यांच्या विरोधात चौकशी प्रलंबित आहे असे सांगून त्यांची नागपूरला बदली करण्यात आली. मात्र, बदलीला न जुमानता ते नागपूरला कर्तव्यावर रुजू झाले नाहीत. नायक यांनी याबाबत राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक या दोघांनाही अधिकृतरित्या पत्र पाठवून त्यांची भूमिका मांडली होती. स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या कारणामुळे नागपूरला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. मात्र, 2015 मध्ये नागपूरला रुजू न झाल्याने दया नायक यांचे पुन्हा निलंबन करण्यात आले. पुन्हा दया नायक यांना 2016 मध्ये राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात रुजू केले.



गोंदियाला बदली करण्यात आली: पुढे काही दिवसांतच त्यांची बदली राज्याच्या एटीएस पथकात झाली. एटीएसमध्ये देखील त्यांची कारकीर्द वादाची ठरली. 2021 मध्ये मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया प्रकरणी एटीएसने तपास केला होता. दया नायक यांच्यावर या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली. मात्र, बदलीच्या या आदेशाला दया नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले आणि बदली आदेशाला स्थगिती मिळाल्याने तिथे नायक यांची जीत झाली आणि ते पुन्हा एटीएसमध्ये आले.

हेही वाचा:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी तहकूब 12 मे रोजी होणार पुढील सुनावणी

Last Updated : May 8, 2023, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details