महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Floating Gold In Sea : समुद्रावर तरंगणारे सोनेरी सुगंधी सोनं अर्थात व्हेल माशाची उलटीची किंमत कोट्यवधीत का? जाणून घ्या सविस्तर - अंबरग्रीस जमवणे किंवा विकणे

व्हेल माशाच्या उलटीतून (Whale Fish Vomiting) येणारा न पचलेला कठीण पदार्थ पाहून अनेकजण तो नाकाजवळ नेऊन सुगंध घेतात. त्याची बाजारात कोटींची किंमत आहेत. तसेच अमेरिकेसह भारतात देखील व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस (ambergris) जमवणे किंवा विकण्यास (gathering or selling whale vomit) बंदी आहे. ही उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षाही सुद्धा होऊ शकते.

Floating Gold In Sea
व्हेल माशाची उलटी

By

Published : Nov 7, 2022, 8:09 PM IST

मुंबई : एखादी विष्ठा म्हटलं की नाक मुठीने थांबतो. पण व्हेल माशाच्या उलटीतून (Whale Fish Vomiting) येणारा न पचलेला कठीण पदार्थ पाहून अनेकजण तो नाकाजवळ नेऊन सुगंध घेतात. त्याची बाजारात कोटींची किंमत आहेत. तसेच अमेरिकेसह भारतात देखील व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस (ambergris) जमवणे किंवा विकण्यास (gathering or selling whale vomit) बंदी आहे. ही उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षाही सुद्धा होऊ शकते. अंबरग्रीस मुल्यवान वस्तू म्हणून ओळखली जाते आणि तिचा वापर परफ्युम्स तसेच महागडे सुगंधी उत्पादने बनवण्यासाठी होतो. अनेक मोठे नामांकित परफ्युम ब्रॅन्ड्स या अंबरग्रीसचा वापर आपल्या उत्पादनांत करतात. कोटींची किंमत असणाऱ्या या उलटीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...


फ्लोटिंग गोल्ड -व्हेल माशाची ही उलटी ‘फ्लोटिंग गोल्ड’ समजली जाते म्हणजे तरंगते सोने. हा व्हेल माशाने उलटी केलेला एक सुगंधी पदार्थ असतो आणि तो नैसर्गिक परफ्युम्स बनवण्यात वापरला जातो. हा फार दुर्मिळ पदार्थ आहे. याची किंमत कोटी रुपयांत असते. पर्यावरण खात्याला भीती वाटते, की जर लोक या पदार्थाच्या मागे लागले, तर ते व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील आणि पर्यायाने त्यांची संख्या कमी होईल. म्हणून या उलटीचा तस्करीला रोख लावून तस्करांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते.


ती प्रत्यक्षात व्हेल माशाची विष्ठा : जरी याला व्हेल माशाची उलटी समजलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ती त्या माशाची उलटी नसून त्याची विष्ठा असते. या माशाची ही विष्ठा समुद्रावर तरंगताना आढळते किंवा किनाऱ्यावर देखील पडलेली सापडते. ती व्हेल माशाच्या आतड्यातून बाहेर आलेली असते. त्याला न पचलेल्या गोष्टी आणि पदार्थाचे भाग यात असतात. त्यामुळे ती कडक दगडासारखी झालेली असते.


याची कोटींच्या घरात किंमत का आहे? : कारण हा पदार्थ फार दुर्मिळ आहे. तो सहज सापडत नाही. क्वचित सापडतो. म्हणून व्हेल माशाची उलटी किंमती आहे. यापासून उत्तम दर्जाची, टिकाऊ वासाची अत्तरे बनतात. ही अत्तरे खूप महागडी असतात. शिवाय हे फ्लोटिंग सोने माणसाच्या हातात पडण्यापूर्वी अनेक दशके महासागरात खूप आत आणि खूप खोलवर पडून राहिलेले असते. त्यानंतर ते क्वचित कधीतरी किनाऱ्याला लागते.


अ‍ॅम्बरग्रीस म्हणजे काय? : अ‍ॅम्बरग्रीस, म्हणजे फ्रेंचमध्ये त्याचा अर्थ राखाडी अ‍ॅम्बर असा आहे. हा एक मेणासारखा पदार्थ आहे. जो संरक्षित शुक्राणू व्हेलच्या पचनमार्गातून तयार होतो. मात्र याला चुकीच्या पद्धतीने ‘व्हेल माशाची उलटी’ असे संबोधले जाते. व्हेल माशाच्या उलटीला अ‍ॅम्बरग्रीस म्हणतात. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अ‍ॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एक प्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.


उलटी कशी ओळखतात : स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.



स्पर्म व्हेल संरक्षित घटक : खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.Conclusion:यासाठी वापरतात अम्बरग्रीस : अत्तर ,सुगंधित उत्पादनात वापर, स्थिरीकरण द्रव्य,अपाय थोडाही नाही, अगरबत्ती, धूप औषधातही वापर,अत्तरापासून कोट्यवधींची माया


नुकत्याच केलेल्या कारवाया : १० जानेवारीला मुरूड येथे खोल समुद्रातील व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अलिबाग-मुरूड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर येथे ७ नोव्हेंबरला सरनोबतवाडी (ता. करवीर) तील सेवा रस्त्यावर ३ कोटी ४१ लाख ३० हजार रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा जणांना आज, शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ३ किलो ४१३ ग्रॅम वजनाची ही उलटीसह चारचाकी जप्त करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details