महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी? जाणून घ्या ईटीव्ही भारतचा रिपोर्ट

विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार? याबाबत ईटीव्ही भारतने केलेली चर्चा...

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय वडेट्टीवार

By

Published : May 21, 2019, 5:51 PM IST

Updated : May 21, 2019, 6:51 PM IST

मुंबई - विरोधी पक्षनेतेपदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या बैठकीत विजय वड्डेटीवार यांचे नाव आघाडीवर आलेले आहे. त्यामुळे वडेट्टीवार या पदासाठी सक्षम आहेत का? आणि या पदाला न्याय देऊ शकतात का? यावर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत ईटीव्ही भारतने केलेली ही चर्चा....

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी विजय वडेट्टीवार यांच्या सहकाऱ्यांशी केलेली चर्चा...

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे उपनेते आहेत. तसेच आता विरोधी पक्षनेतेपदाची जागाही खाली झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर आलेले आहे.

Last Updated : May 21, 2019, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details