महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोण होणार मुख्यमंत्री..? मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसण्यासाठी शिवसेनेच्या 'या' सहा नेत्यांची नावे आघाडीवर - महाराष्टाचा मुख्यमंत्री

यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय राहणार नाही' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र आता 'मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा तो शिवसैनिक कोण असेल?'

'मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल ?

By

Published : Nov 11, 2019, 12:18 PM IST

Updated : Nov 11, 2019, 12:35 PM IST

मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेच्या घडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेत आघाडी सोबत संसार सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपने काल सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची लगीनघाई सुरू झाली आहे. आता ज्या कारणसाठी शिवसेनेने भाजपकडून काडीमोड घेतला. त्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणत्या शिवसैनिकाच्या गळ्यात पडणार हा संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे. शिवसेनेकडून कोण मुख्यमंत्री होऊ शकतो या अनुषंगाने घेतलेला आढावा..

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार यावर शिवसेना ठाम आहे. आत्तापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. परंतु, यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय राहणार नाही' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र आता 'मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा तो शिवसैनिक कोण असेल?' त्यामध्ये ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीत उभं राहून निवडून येणारे आदित्य ठाकरे, शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते संजय राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई या शिवसैनिकांची नावे पुढे येत आहेत. या शिवाय स्वत: उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री विराजमान व्हावे अशी शिवसैनिकांची ईच्छा आहे.

उद्धव ठाकरे -

'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज' असल्याची पोस्टरबाजी शिवसैनिकांनी मुंबईमध्ये केली आहे. शिवसैनिकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याच वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकेरांना दिले होते. मग सध्याच्या स्थितीत आजवर ज्या विचारसरणीच्या विरोधात प्रचार करून मते मागितली त्या आघाडीसोबत सत्ता स्थापन करताना, जो समतोल साधायचा आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळू शकतात.

आदित्य ठाकरे -

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झालेले आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशीही काही शिवसैनिकांची इच्छा आहे. एक युवा चेहरा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतात. मात्र, सध्य स्थितीत त्यांचे नाव मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

संजय राऊत -

संजय राऊत हे देखील शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून दावेदार ठरू शकतात. निकालानंतर दररोज पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी देखील शिवसेनेचा कणखर बाणा भाजपसह राज्याला दाखवून दिला आहे. त्यांनी ठामपणे शिवसेनेची बाजू प्रसिद्धी माध्यमांसमोर लावून धरली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षात बसणाऱ्या भाजपला थोपविण्यासाठी सडेतोड नेतृत्व म्हणून संजय राऊत यांच्याकडे देखील पाहिले जाऊ शकते.

एकनाथ शिंदे -

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमातून समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातील कामाचा चांगला अनुभव आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या शिवाय मागील काळात त्यांनी भाजपच्या कुरघोड्यांना शह देण्याचे काम त्यांनी केले आहे. याशिवाय शिवसेनेत त्यांचा एक स्वतंत्र गट आहे. शहर आणि ग्रामीण राजकारणाची हाताळणी करण्यासाठी ते सक्षम समजले जातात. त्यामुळे सध्य स्थितीत एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर येऊ शकते.

दिवाकर रावते, सुभाष देसाई -

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई यापैकी एखाद्या नेत्याचीही लॉटरीही शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी लागू शकते. या दोन्ही नेत्यांनाही मंत्रिमंडळातील कामाचा चांगला अनुभव आहे, रावतेंनी अनेकवेळा शिवसेनेची भूमिका ठामपणे महाराष्ट्रापुढे मांडण्याचे काम केले आहे.

१९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा आधी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती. ठाकरे घराण्याने आजवर सत्तेत कोणतेही पद घेतलेले नव्हते. यावेळी हीच ती वेळ म्हणून आदित्य किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतील अशीही चर्चा आहे. मात्र, काही तासातचं हे चित्र स्पष्ट होईल.

Last Updated : Nov 11, 2019, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details