महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitesh Rane : हातात भगवा घेतल्याने हिंदुत्ववादी किंवा त्या विचारांचा होत नाही; नितेश राणेंची टीका - Who a Hindu by holding

Nitesh Rane Criticism: प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळ बेकायदा बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ही अतिक्रमणे हटवण्यासाठी साल २०१७ पासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो. पण कोणाच्यामध्ये हिम्मत झाली नाही.

Nitesh Rane Criticism
Nitesh Rane Criticism

By

Published : Nov 11, 2022, 3:08 PM IST

मुंबईप्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे काल हटवण्यात आल्याने याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज भाजप प्रदेश कार्यालयात नितेश राणे उपस्थित झाले होते. याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. अनेक वर्ष कुणालाही जमलं नाही, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करून दाखवले आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

इतकी वर्ष कुणाच्यात हिम्मत नव्हती:प्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे काल पूर्ण हटवण्यात आली. याप्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रतापगडावर करण्यात आला होता. प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळ बेकायदा बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ही अतिक्रमणे हटवण्यासाठी साल २०१७ पासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो. पण कोणाच्यामध्ये हिम्मत झाली नाही. अतिक्रमण हटवायला कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. परंतु शेवटी देवेंद्र फडवणीस यांनी ते करून दाखवले आहे. फक्त भगवा झेंडा हातात घेतला तर कोणी हिंदुत्ववादी व हिंदू विचाराचे होत नाही, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना तसेच शिवसेनेला टोमणा लगावला आहे.

आतापर्यंत अतिक्रमण का आठवले गेले नव्हते ? यापुढे बोलतोना नितेश राणे म्हणाले की, नवाब मलिक, असल्म शेख यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. परंतु त्यांना हे काम जमले नाही. खरे म्हणजे माणसाने मनाने आणि रुदयाने हिंदुत्ववादी असायला पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले. या अगोदर सुद्धा अतिक्रमण पाडण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होते. आताही त्या अडचणी होत्या, परंतु देवेंद्र फडवणीस यांनी त्या दूर केल्या आहेत. आमचे हिंदूंवर, महाराजांवर प्रेम आहे, असं उद्धव ठाकरे सांगतात. त्याचबरोबर तेच राष्ट्रवादीचे नेतेही सांगतात, मग हे अतिक्रमण आतापर्यंत का हटविले गेले नव्हते ? असा प्रश्नही त्यांनी या प्रसंगी उपस्थित केला.

अफझल खान, औरंगजेब यांच्या आठवणी महाराष्ट्रात कशाला ? औरंगजेब, अफजल खान यांच्या आठवणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कशाला हव्यात. जे आपल्या विरोधात लढले, महाराजांच्या विरोधात लढले त्यांच्या आठवणी इथे कशाला ठेवायला पाहिजेत, असं सांगत अफजल खानाची कबर सुद्धा हटवली जाईल. आणि सर्व जनता झोपेत असतानाच हटवली जाईल, त्याचा थांपत्ताही कुणाला लागणार नाही, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details