मुंबई : मुंबईमध्ये गौरी-गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. मुंबईच्या पवई तलाव परिसरामध्ये भाविक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत. पूर्व उपनगरातील पवई घाट हा सर्वात मोठा विसर्जन घाट आहे. या ठिकाणी मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. विसर्जनादरम्यान ही मगर ही ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
पवई तलावात गणेश विसर्जनादरम्यान मगरीचे दर्शन
मुंबईच्या पवई तलाव परिसरामध्ये भाविक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत. पूर्व उपनगरातील पवई घाट हा सर्वात मोठा विसर्जन घाट आहे. या ठिकाणी मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. विसर्जनादरम्यान ही मगर ही ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. पवई तलावामध्ये असलेला मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनासाठी या परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे, त्या गणेश घाटावर तारेचे कुंपण तयार करण्यात आलेले आहे. या कुंपणाच्या बाहेर मगरीचा वावर दिसून येतोय.त्यामुळे पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा -धक्कादायक : वर्धा नदीत बोट उलटून ११ जण बुडाले, अमरावती जिल्ह्यातील गाळेगाव येथील घटना