मुंबई -मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यात आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे कोरोना काही प्रमाणात कमी झाला. मात्र, लोकांची गर्दी वाढल्याने, तसेच फेब्रुवारी महिन्यात लोकल ट्रेन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे मुंबई पुन्हा लॉकडाऊन दोनच्या दिशेने जात आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईकर बेफिकीर झाले असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. लॉकडाऊन हवा की, नको हा सर्वस्वी निर्णय मुंबईकरांच्या हाती असल्याचे महापौरांनी म्हटले.
हेही वाचा -सोमाटण्यातील टोलनाका बंद करावा; स्थानिकांची मागणी, घेतली राज ठाकरे यांची भेट
कोरोना आकडेवारी -
मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचे ३ लाख १५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ११ हजार ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ९७ हजार १०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५ हजार ६४९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३० लाख ३९ हजार ४६१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या केल्या उपाययोजना -
मुंबईत गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण, आरोग्य शिबीरे, नियमित तपासण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तत्काळ शोध घेऊन क्वारंटाईन, कंटेन्मेंट झोन, इमारती सील करून कठोर अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना आदींमुळे कोरोना आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले.
रुग्णसंख्या वाढली -
डिसेंबर नंतर नवीन वर्षाच्या प्रारंभापासून कोरोना उतरणीला लागला. रोज दोन ते अडीच हजारापर्यंत सापडणारे कोरोना रुग्ण २ फेब्रुवारीला ३३४ वर आले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर टप्प्या-टप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरू केली. मात्र, गर्दी वाढल्याने आठवड्याभरातच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ३३४ वर असलेली रुग्णसंख्या दुपटीने वाढून सहाशेवर पोहचली आहे.
या विभागात वाढत आहे रुग्णांची संख्या -
मुंबईतील बोरीवली भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती ४०८ पर्यंत पोहचली आहे. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या ३७८ वर पोहचली आहे. त्यात या परिसरातील १०० इमारती सील करण्यात आल्या आहेत. कांदिवली, चारकोपमध्ये ३४५ कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी आतापर्यंत ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ इथे ३३८ कोरोना रुग्ण आहेत.
मुलुंडमध्ये २९२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून इथे २०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. इथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोसायट्यांना नोटीस -