मुंबई -आम्ही जिथे उभे राहू तेथून जिंकून येऊ असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी व्यक्त केला. गणराया आमच्या पाठिशी असल्याचेही राणे म्हणाले.
आम्ही जिथे उभे राहू तेथून जिंकून येऊ - नारायण राणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे
आम्ही जिथे उभे राहू तेथून जिंकून येऊ, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी व्यक्त केला.
मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले, की गणराया आमच्या पाठीशी असून आम्ही जिथे उभे राहू तिथे जिंकून येऊ.
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतरच राणेंबाबत निर्णय होणार असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे आता कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.