मुंबई:खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील फोटो वायरल झाल्यानंतर शिवसेना शिष्टमंडळाने लीलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत, विचारपूस करून पोलिसात तक्रार केली आहे. एकीकडे हा विषय रंगलेला असताना किरीट सोमैया यांनी फोटो व्हायरल प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुर्वी एक तक्रार केली होती. या प्रकरणात सरनाईक यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे तसेच एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.
नवनीत राणांच्या हॉस्पिटल मधील फोटो संबंधी शिवसेना नेते एवढी उठाठेव करतायेत परंतु, ज्यावेळी मंत्रालयातील प्रताप सरनाईकाच्या घोटाळ्याची फाईल माहिती अधिकार अंतर्गत निरीक्षण करण्यासाठी मी गेलो होतो, तिथे प्रताप सरनाईक माझ्या शेजारी येऊन बसले. अधिकाऱ्यांशी दमबाजी केली, फोटो काढले, व्हायरल केले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माफीया सेना का गप्प होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हणले आहे की, मंत्रालयात नगर विकास विभागात माहिती अधिकार अंतर्गत दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी मी फाईलचे निरीक्षण करण्यासाठी आलो होतो. नगर विकास विभागाने मला अधिकृत वेळ व जागा दिली होती. माहिती अधिकार अंतर्गत मी निरीक्षण करत असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गैरकारदेशीररित्या माझ्याजवळ आले, माझ्या शेजारी खुर्ची ओढून खुर्चीवर बसले. माहिती अधिकारा खाली अर्जदार फाईलचे निरीक्षण करत असताना, बाहेरची व्यक्ती अशा पद्धतीने जवळ येऊ शकत नाही.
मी आमदार प्रताप सरनाईकच्या घोटाळ्याची फाईल पाहत असताना त्यांनी असे मुद्दामहून तिथे येणं आसपास च्या अधिकाऱ्यांना धमकावणे हे कायद्याचे भंग करणारे आहे. आमदार प्रताप सरनाईक व त्याच्या सहकाऱ्यांनी माझ्याजवळ त्यावेळचे फोटो काढले होते ते व्हायरल केले होते. मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकारने यांच्या अंतर्गत हे फोटो व्हायरल झाल्यावर मला व दोन अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या व स्पष्टीकरण मागवले. या संदर्भात मंत्रालयात नगर विकास विभागात संरक्षण विभागात याची उत्तरेही आली. माझे सुरक्षा रक्षक, कमांडो सीआयएसएफ यांनीही यासंबंधी विचारणा केली होती.
मी सुद्धा याबाबतीत दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, मुंबई. दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी जन माहिती अधिकारी तथा कार्यासन अधिकारी नगर विकास, मंत्रालय मुंबई, दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी राज्य मुख्य माहिती आयोग दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य, अतिरिक्त पोलीस आयुक्त संरक्षण विभाग, पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या संदर्भात तक्रार करून काही महिने झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी सगळ्या नियमांचा भंग केला. गैरकायदेशीररित्या फोटो काढले. ते फोटो व्हायरल केले. अजून पर्यंत आपण, महाराष्ट्र सरकारने यांनी त्यांच्या काही कारवाई केली नाही, पोलिसांनी एफआयआर सुद्धा घेतला नाही. यासंबंधात कारवाई करावी ही विनंती.
दुसरीकडे नवनीत राणा यांचे एमआरआयचे फोटो कसे काढले? एमआयआर काढला की नाही? की ते फेक होते का? फोटो काढणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? कुणी तरी बोलल्यानंतर तुम्ही कारवाई करत आहात. त्याआधी का केली नाही? उद्या कोणी उठून कुणाचेही शुटिंग करणार, ते चालेल का? सर्व नियम पाळले पाहिजे. तुम्ही जर प्रेशरमध्ये असाल तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा. तुम्हाला घाबरवले ते सांगा, असे मनिषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला विचारत धारेवर धरले.
MNS Bala Nandgaonkar : 'भाजपाचा युपीतील एक खासदार म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नाही'