महाराष्ट्र

maharashtra

मंत्री संजय राठोड प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

By

Published : Feb 24, 2021, 4:47 PM IST

वनमंत्री संजय राठोड तब्बल वीस दिवसांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला सह्याद्रीवर दाखल झाले आहेत. आधीच पूजा आत्महत्येबाबत वादात सापडलेले असताना मंगळवारी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत राठोड यांच्याबाबत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Rathore in the cabinet meeting
मंत्री संजय राठोड प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

मुंबई- शासकीय कामकाजपासून दूर राहिलेले वनमंत्री संजय राठोड तब्बल वीस दिवसांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला सह्याद्रीवर दाखल झाले आहेत. आधीच पूजा आत्महत्येबाबत वादात सापडलेले असताना मंगळवारी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत राठोड यांच्याबाबत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूजा आत्महत्या प्रकरणी भाजपकडून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन कारवाईची मागणी केली जात आहे. तर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून चौकशीतून सत्य समोर येईल. तोपर्यंत माझ्यावर आरोप करणे थांबवावे, असे राठोड यांनी पोहरादेवी तेथे स्पष्ट केले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, मोठी गर्दी करून शक्तीप्रदर्शन केल्याप्रकरणी ते पुन्हा वादात सापडले. शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येही नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत राठोड यांच्याबाबत काय निर्णय होणार? मुख्यमंत्री राजीनामा घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राठोड यांना व्हीप

पूजा आत्महत्या प्रकरणानंतर दोन मंत्रिमंडळ बैठकीला राठोड गैरहजर राहिले होते. आज होणाऱ्या बैठकीलाही राठोड अनुपस्थित राहणार होते. मात्र, पोहरादेवी गर्दी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना व्हीप पाठवून बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळेच राठोड मंत्रिमंडळ बैठकीला सह्याद्रीवर उपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details