मुंबई: किरीट सोमैय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सीआयएसएफने मुंबई पोलिसांना जाब विचारला त्यानंतर मुंबई पोलिसांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. सोमैय्यांना केंद्रसरकारची झेड सिक्युरिटी आहे. मग त्यांच्यावर हल्ला होत असताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करा अशा आशयाचे पत्र पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लिहिले आहे. यामुळे केंद्र विरुद्ध मुंबई पोलीस असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. सीआयएसएफचे महासंचालक काय करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी त्यांच्यावर शनिवारी हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली, नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची सुरक्षा असलेल्या सीआयएसएफच्या महासंचालकांनी या प्रकरणाची माहिती विचारणा करण्या करता मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले. या पत्राला उत्तर देताना संजय पांडे यांनी सीआयएसएफ च्या जवानांची चौकशी करण्यात यावी असे कळवलेआहे.