महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sea Swimming : समुद्रात पोहण्यासाठी कोणती तयारी करावी लागते? पोहण्यासाठी घ्यावी लागते परवानगी

आपण तलावात नदीत पोहतो, पोहायला ( Swimming in Mumbai Bay ) शिकतो. तलावा मधल्या स्पर्धेमध्ये भागही घेतो. मात्र मुंबईच्या समुद्राच्यामध्ये पोहणे हे तितकसं साध ( Swimming in Mumbai Bay ) नसतं. आपण ठरवलं की, चला आता खाडीमध्ये पोहायला जायचं ( Swim in Mumbai Bay ) आहे. इतकं साधं सोपं काम ते नसतं.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jan 1, 2023, 8:02 PM IST

मंत्रा मंगेश कुर्हे

मुंबई -आपण दरवर्षी प्रसारमाध्यमातून पाहतो अमुक विद्यार्थी विद्यार्थिनीने एक विक्रम केला. मुंबईची खाडी पोहून ( Swimming in Mumbai Bay ) दाखवली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश ( British Gulf Internationally ) खाडी पोहुन दाखवली. त्यानंतर त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार होतो. मात्र या अथक प्रयत्नापर्यंत हे विद्यार्थी पोहोचताच कसे. काय तयारी करतात. काही आव्हानं त्यांच्यासमोर असतात. इवल्याश्या वयामध्ये खाडी ( Swim in Mumbai Bay ) पोहण्याचे विचार त्यांच्या मनात येतात कसे कोणकोणत्या अडचणी त्यांच्या समोर येतात.हे रोमहर्षक आहे.

मंत्रा कुऱ्हेचे नाव एशिया बुक रेकाॅर्डमध्ये

समुद्रात पोहोण्याचा विक्रम -मुंबईच्या समुद्रात दरवर्षी वयोगटा प्रमाणे लहान मोठे व्यक्ती पोहोण्याचा विक्रम करत असतात. परंतु हा विक्रम करण्यासाठी आधी ज्यांना पोहायचं असतं. त्यांना पोहोण्याचा सराव रोज असायला हवा. हा सराव केवळ आपल्या मनाने करून चालत नाही. योग्य प्रशिक्षक मार्गदर्शक त्यासाठी असावे लागतात. मगच या संदर्भातल्या सर्व आव्हानांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो.

मुंबईच्या समुद्रात पोहण्यासाठी असा करावा लागतो सराव -ज्यांना पोहोचायचं जे सराईत पोहणारे असो अगर नसो. त्यांना किमान रोज 3 तास पोहणे हा सराव करावा लागतो. याचे कारण ज्या वेळेला समुद्रात पोहोतात. तेव्हा तुमच्या एकूण शरीरामध्ये होणारे बदल समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा होणारा मारा, त्यासाठी तुमचं शरीर तयार असावं लागतं. म्हणून आधी तलावात रोज तास दोन तास नंतर ते वाढवत नेत पाच सहा तास असा सराव करावा लागतो. तलावात पोहोण्यासोबत समुद्रात पोहोण्याचा देखील सराव करावा लागतो. त्यानंतर मुंबईची खाडी पोहण्यासाठी तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी तावून सुलाखून तयार होते.

कोणकोणते अर्ज कुठल्या एजन्सीकडे करावे - मुंबईच्या येलो गेट पोलीस स्टेशनला, मुंबई महानगरपालिकेला, मुंबई जिल्हाधिकारी तसेच राज्य स्विमिंग फेडरेशन या प्राधिकरणाकडे पोहणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या पालकांना अर्ज करावा लागतो. या अर्जाच्या आधी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शारीरिक तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत असावे लागते. ते या विविध अर्जासोबत जोडावे लागते. साधारणता 15 ते 20 दिवस या सगळ्या परवानगीला वेळ लागतो. जेव्हा समुद्रात पोहायचे आहे हा निर्णय नक्की केलेला असतो. त्यापासून पुढील महिना ते दीड महिन्याच्या कालावधीत या अनुमती घेतल्या जातात. जेणेकरून पोहण्यासाठी कुठलाही अडथळा अडचण येणार नाही.

किती रुपये खर्च येतो -कोणत्या ठिकाणाहून पोहायचे आहे, कुठपर्यंत पोहायचे आहे, या संदर्भातले मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे शिकवणारे शिक्षक करत असतात. जेव्हा समुद्रातून पोहायचे असते त्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित नाव किंवा होड्या याची गरज लागते. त्याशिवाय पट्टीचे पोहणारे सुरक्षा रक्षक कोच हे देखील त्या नावेमध्ये असावे लागतात. याची व्यवस्था आधीच करावी लागते. परवानगी घेताना याच्या संदर्भात सगळी तपशीलवार माहिती पोलीस जिल्हाधिकारी, स्विमिंग फेडरेशन यांना द्यावे लागते. या दोन संचलित नावेचा खर्च एकूण लाखाच्या आसपास असतो. म्हणजे एकूणच एका व्यक्तीला समुद्रात खाडीमध्ये पोहण्यासाठी एक लाख ते दीड लाख रुपये खर्च लागतो. सामान्य घरातील व्यक्तींना मुला मुलींना हा खर्च झेपत नाही. त्यामुळेच त्या मुला-मुलींना शासनाने मदत करावी;अशी पालकांची इच्छा असते.

आहारामध्ये करावे लागतात बदल -जे विद्यार्थी विद्यार्थिनी आधीपासून पोहोतील त्यांना विशेष अशी तयारीची गरज नसते. डॉ तृप्ती मंत्रा म्हणतात," जेव्हा मंत्राने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हा समुद्र पोहण्याचा विचार नक्की केला. 38 किमी अंतर 7 तासात पार केले. तेव्हा हा मार्ग अवघड होता. त्यासाठी रोज सराव करणे रात्रीच्या वेळी समुद्रात पोहणे या सगळ्या गोष्टीचा सराव करणे आवश्यक होते. काहींची शरीर प्रकृती वेगळी असते. उदाहरणार्थ पोहणाऱ्या व्यक्तीला चॉकलेट कॅडबरी विशेष करून डॉक्टर खायला सांगतात. त्याचे कारण समुद्रात सराव करायचा असतो. चार-पाच तास या काळामध्ये एक तर मीठ साखर घातलेले पाणी किंवा ओआरएस अधिक चांगलं. करण समुद्रातील खाऱ्या पाण्यामुळे शरीरातील पाणी कमी होत जातं. समुद्रात खारं पाणी असतं त्याचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. शरीरातील पाणी कमी होतं. काहीजण कोक देखील पितात. काहीजण थंड पेय देखील सोबत घेतात. परंतु सगळ्यांनाच ते चालतं असं नाही. भरपूर प्रथिने असलेले पदार्थ खावे. पचायला हलके असलेले पदार्थ या काळामध्ये खावे लागतात. कारण वजन फार वाढणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते."

समुद्रात पोहणे आव्हान -समुद्रात पोहण्यासाठी कशी तयारी केली. कसं आव्हान असतं. याबाबत मंत्रा मंगेश कुर्हे ही शाळेतील विद्यार्थिनी ईटीव्ही सोबत बातचीत करताना म्हणते;" मी सात तास 50 मिनिटांमध्ये मुंबईची 38 किलोमीटरची खाडी पोहले .रोज सात तासाचा पोहण्याचा मी सराव करत होते. हा पोहण्याचा निर्णय साधारणतः एक ते दीड महिन्याच्या आधी घेतला. मी लहानपणापासूनच पोहत होते. त्याच्यामुळे मला हे फारसं जड गेलेले नाही. एरवी देखील मी रोज तीन ते चार तास पूलमध्ये पोहण्याचा सराव करतच असते. खाडीमध्ये पोहायचं तर त्यासाठी जेली फिश चाऊ शकतात. म्हणून रात्रीच्या वेळी देखील चार तास पोहोण्याचा सराव समुद्रामध्ये केला आहे. समुद्रामध्ये विशेष करून महानगराचा कचरा, पाण्यातील साप, प्रचंड मोठा वारा याला सामोर जावं लागतं. म्हणून याची तयारी करण्यासाठी आधी समुद्रात पोहण्याचा सराव देखील हवा.


नोव्हेंबर ते मार्चध्ये समुद्रात पोहोण्याची अनुमती -यासंदर्भात समुद्रात पोहोण्यासाठी प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडणारे नकुल पाटील यांनी सांगितले, "दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्याच्या कालावधीमध्येच मुंबईतील समुद्राची खाडी आपल्याला पोहता येते. अन्यथा इतर काळामध्ये खाडीमध्ये पोहण्यास मनाई केली जाते याचे. कारण समुद्राच्या वरती हवेच्या दाबाचे पट्टे असतात. तुफान वादळ, वारा, पाऊस, हवा यामुळे त्या काळात समुद्रात पोहणे धोक्याचे जोखमीचे असते. त्यामुळेच नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्याच्या काळामध्येच कोणत्याही पोहणाऱ्या व्यक्तीला पोहोता येते ."

ABOUT THE AUTHOR

...view details