महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2020, 5:49 PM IST

ETV Bharat / state

अशोक चव्हाण जे बोलले ते योग्यच- मंत्री नवाब मलिक

नांदेडमध्ये बोलताना मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापण करण्याविषयीचा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर, आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला होता. त्यावर महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, चव्हाण जे काही बोलले ते योग्यच असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

mumbai
नवाब मलिक

मुंबई- महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार येण्याआधी किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. सरकार त्यावरच चालत आहे. याबाबत अशोक चव्हाण जे बोलले ते योग्यच आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

तीन पक्षाचे सरकार बनविण्या संबंधीचा गौप्यस्फोट केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू आहेत. नांदेडमध्ये बोलताना मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापण करण्याविषयीचा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर, आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला होता.

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर तीन पक्षाचे सरकार येण्याआधी किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. सरकार त्यावरच चालले आहे. अशोक चव्हाण जे बोलले त्यात काही गैर नाही, असे नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा-'धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील'

ABOUT THE AUTHOR

...view details