महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किती असेल कोरोना लसीची किंमत? वाचा...

कोरोनाला कायमचे हरवण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे लस. त्यामुळेचे अमेरिकेसह कित्येक देश लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. सद्या 6 लस तिसऱ्या टप्प्यात असून, लवकरच या लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्या देशाचे लक्ष ही लस कधी येणार याकडे जसे लागले तसेच या लसची किंमत किती असणार याकडेही लागले आहे.

What is the cost of a vaccine for corona?
काय असेल कोरोना लशीची किंमत? वाचा...

By

Published : Jul 29, 2020, 3:25 PM IST

Updated : Jul 29, 2020, 4:45 PM IST

मुंबई - कोरोनाला कायमचे हरवण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे लस. त्यामुळेचे अमेरिकेसह कित्येक देश लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. सद्या 6 लस तिसऱ्या टप्प्यात असून, लवकरच या लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्या देशाचे लक्ष ही लस कधी येणार याकडे जसे लागले तसेच या लसची किंमत किती असणार याकडेही लागले आहे. तर वेगवेगळ्या लशींच्या अंदाजित किंमती आता वर्तवल्या जात आहेत. त्यानुसार 1000 ते 5000 च्या घरात असण्याची शक्यता आहे.

आजच्या घडीला 150 लशींवर काम सुरू आहे. यातील 140 लस पहिल्या टप्प्यात असून केवळ 6 लस तिसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे कुणी आपली लस महिन्याभरात येईल, असा दावा करत आहे तर कुणी डिसेंबरपर्यत लस येईल असे सांगत आहेत. ही लस भारतात लवकरात लवकर उपलब्ध व्हावी आणि ती स्वस्त दरात लस मिळावी हीच अपेक्षा कोट्यवधी भारतीय करत आहेत. त्यातही सरकारने मोफत लस उपलब्ध करून देण्याची ही मागणी होत आहे. अशात आता विविध लशीच्या अंदाजित किंमती काय असतील याचे एक एक अंदाज पुढे येत आहेत. 'कोवेक्स' ही लस तिसऱ्या टप्प्यात असून या लशीची किंमत किती असेल याचा अंदाज लस तयार करणाऱ्या ग्लोबल वैक्सिन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेथ बर्कल यांनी याची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार लशीची किंमत 40 डॉलर अर्थात तीन हजार रुपये अशी असणार आहे. त्याचवेळी या किंमती वरखाली होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. इतर परवानग्या आणि लायसन्स यावर ही अंतिम किंमती अवलंबून असतील. तर देशाप्रमाणेही लशीची किंमत कमी जास्त ठेवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मॉडर्ना कंपनीची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीची किंमत 3700 ते 4500 रुपये अशी असण्याची शक्यता आहे. अमेरिकेतच आणखी एक फाईझर लस तयार होत आहे. या लशीची किंमत 1500 रुपये अशी असण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्डची लसही अंतिम टप्प्यात असून ही लस जितक्या लवकर येईल तितकी भारतीयांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. कारण या लशीच्या निर्मितीत भारतातील सिरम इन्स्टिट्यूट, पुणे ही कंपनी सहभागी असून भारताला 50 टक्के लस उपलब्ध होणार आहेत. तर आता या लशीची किंमत 1000 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात कोरोनावरील लस मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. यावर केंद्र सरकार काय भूमिका घेते हे येत्या काळात समजेल. पण आता कोणती का होईना लस बाजारात उपलब्ध व्हावी आणि कोरोना कायमचा नष्ट व्हावा अशीच इच्छा जगभरातून व्यक्त होत आहे.

Last Updated : Jul 29, 2020, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details