मुंबई- पश्चिम रेल्वेने विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईत 14 कोटी 48 लाखांचा दंड वसुल केला आहे. पश्चिम रेल्वेने मे महिन्यामध्ये हा दंड वसुल केला आहे.
पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून केला 14 कोटींचा दंड वसुल - मुंबई
पश्चिम रेल्वेने विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईत 14 कोटी 48 लाखांचा दंड वसुल केला आहे.
पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून केला 14 कोटींचा दंड वसुल
मे महिन्यामध्ये विनातिकीट आणि नोंद न केलेल्या सामानासह अनधिकृत प्रवास केल्याची एकूण 2 लाख 87 हजार प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाच्या रक्कमेत 24.01 टक्के वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेने मे महिन्यामध्ये 338 भिकारी आणि 919 अनधिकृत फेरिवाल्यांवरही कारवाईचा बडगा उचलला आहे. याप्रकरणी दंड आकारुन त्यातील 287 जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी 205 तिकीट दलालांनाही रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.