मुंबई - पश्चिम रेल्वेत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत ४ हजार प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल 109 टन प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढला गेला. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गांधी जयंती निमित्त राबवण्यात आली होती.
रेल्वे कर्मचारी स्वच्छता आभियान राबवताना
पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर गेली ६ महिने स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत त्यांनी कचरा करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत देशातील स्वच्छता अभियानात महत्वपूर्ण योगदान दिले. या अभियानात रेल्वे प्रशासनाने १०९ टन प्लास्टिक आणि कचरा उचलेला आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी ४ हजार प्रवाशांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. या सर्व कारवाईत रेल्वे प्रवाशांकडून ७ लाख ६० हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.
रेल्वे स्वच्छता अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या उपक्रमांबाबत बोलताना कुमार डेवीज हेही वाचा - ' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा'
पश्चिम रेल्वेतील स्वच्छता अभियानाअंतर्गत मुंबईतील सर्वात जास्त अस्वच्छता असलेल्या रेल्वे स्थानाकांपैकी एक माहिम स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. या स्थानकावर रेल्वे प्रशासनाने ३६ लोकांवर वेग-वेगळी कारवाई करत त्यांच्याकडून १५००० हजार रुपये दंड स्वरूपात आकारले आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
पश्चिम रेल्वेने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियानाची मोहीम पार पाडली. ही मोहीम महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान रेल्वे प्रशासनाने रेल्वे पटरी, रेल्वे स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छता गृह, लोकल रेल्वे मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोसायटी इत्यादी सर्व ठिकाणी अभियान राबवित स्वच्छता केली असल्याची माहिती कुमार डेवीज यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबई : महिला रुग्णावरील बलात्कारप्रकरणी 58 वर्षीय डॉक्टरला अटक