मुंबई : राजस्थानमधील अजमेर येथे दरवर्षी प्रसिद्ध वार्षिक उर्स सोहळ्यासाठी लाखो भाविक जात असतात. प्रवाशांच्या सोयीकरिता रेल्वे प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस-मदार, वांद्रे टर्मिनस-दौराई, सुरत-मदार आणि अहमदाबाद-अजमेर या मार्गावर ५ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. २१ जानेवारीपासून या विशेष गाड्यांचे आरक्षण सुरु होणार आहे. भारतीय रेल्वेने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
मदार स्पेशल ट्रेन : ट्रेन क्रमांक ०९६५८ वांद्रे टर्मिनस - मदार स्पेशल शनिवार, २८ जानेवारी २०२३ रोजी वांद्रे टर्मिनसपासून १९.२५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १४.२० वाजता मदारला पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९६५७ मदार – वांद्रे (टी) विशेष शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी मदार येथून २३.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.०५ वाजता वांद्रे (टी) येथे पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशेने बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम, चित्तोडगड, भिलवाडा, विजयनगर, नशिराबाद आणि अजमेर स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.
दौराई स्पेशल ट्रेन : ट्रेन क्रमांक ०९६६० वांद्रे टर्मिनस - दौराई स्पेशल रविवार, २९ जानेवारी २०२३ रोजी वांद्रे टर्मिनसपासून १५.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता दौराईला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९६५९ दौराई - वांद्रे (टी) विशेष शनिवार, २८ जानेवारी, २०२३ रोजी 20.05 वाजता दौराई सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.10 वाजता वांद्रे (टी) येथे पोहोचेल. ही गाडी बोरिवली, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, पालनपूर, अबू रोड, पिंडवाडा, जावई बंद, फलना, राणी, मारवाड, सोजत रोड आणि बेवार स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
सुरत मदार स्पेशल ट्रेन : ट्रेन क्र. ०९१४९ सूरत - मदार जंक्शन सुपरफास्ट स्पेशल गुरुवार, २६ जानेवारी २०२३ रोजी सुरतहून २३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.३५ वाजता मदार जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९१५० मदार जंक्शन - सुरत स्पेशल मदार जंक्शन शुक्रवार २७ जानेवारी २०२३ रोजी १८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.२० वाजता सुरतला पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना वडोदरा, रतलाम, नीमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर, नसीराबाद आणि अजमेर स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 3-टायर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे जनरल डबे असतील.