मुंबई -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. आज देशभरात आणि मुंबईमध्ये याचा मोठा प्रभाव दिसत आहे. गुजरातला जोडणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग रिकामा दिसत आहे.
जनता कर्फ्यूचा प्रभाव: पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली - पश्चिम द्रुतगती महामार्ग
मुंबईमध्ये 'जनता कर्फ्यू'चा मोठा प्रभाव दिसत आहे. गुजरातला जोडणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग रिकामा दिसत आहे. दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणात हजारो वाहनांची ये-जा असते.
![जनता कर्फ्यूचा प्रभाव: पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली Western highway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6499090-thumbnail-3x2-highway1.jpg)
पश्चिम द्रुतगती महामार्ग
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली
हेही वाचा -पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज देशभर 'जनता कर्फ्यू'..
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कमी झाल्याचे दिसून येत आहे. दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणात हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र, आज सकाळपासूनच या मार्गावर शुकशुकाट आहे.