मुंबईWestern Ghats Land Erosion:पश्चिम घाट हा युनोस्कोने जागतिक वारसांपैकी एक घोषित केलेला महत्त्वाचा पर्यावरणीय वारसा आहे. जो पर्यावरणाला आणि एकूणच हवामान बदलामध्ये समतोल म्हणून भूमिका निभावणारा विभाग आहे. हा विभाग महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ह्या सर्व राज्यांनी व्यापलेला आहे; परंतु आता त्याच संपूर्ण परिसराच्या जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे मानवी संकट असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी संशोधनाच्या आधारे सिद्ध केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या शोधाची दखल 'जिओग्राफिकल अर्थ सायन्स' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये घेतली गेली आहे. शासन आणि समाज या दोन्हींनी काळजी घेण्याची गरज त्यांनी त्यात व्यक्त केलीय.
राज्यानुसार झालेली मातीची धूप:पश्चिम घाट विभागामध्ये 1999 ते 2020 या 25 वर्षांचा अभ्यास आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ पेंननचेन्नन सामी, वैष्णवी होनाप संशोधकांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासामध्ये देशातील राज्यनिहाय मातीची जी धूप झाली त्यामध्ये तामिळनाडू 121 टक्के तर गुजरात 119 टक्के आणि महाराष्ट्रात 96 टक्के तर केरळ 90 टक्के, गोवा राज्यात 80 टक्के, कर्नाटकात 56 टक्के ही माहिती समोर आली आहे. पश्चिम घाट पर्यावरणात समतोलाची भूमिका पार पाडतो; मात्र आता धूप अधिक झाली तर वातावरणात विपरीत बदल होतील.
प्रति हेक्टर प्रतिवर्षी 50 टन धूप?पश्चिम घाटात झालेली धूप ही प्रति हेक्टर प्रतिवर्षी सरासरी 46 टन ते 62 टन इतकी आहे. यामध्ये 1990 साली ही 32 टन तर 2000 साली 46 टन इतकी नोंदविली गेली. 2010 साली 50 टन एवढ्या प्रचंड प्रमाणात धूप झाली आहे. तसेच 2020 मध्ये प्रति हेक्टर प्रतिवर्षी 62 टन मातीची धूप झालेली आहे. हवामान बदलांमध्ये पश्चिम घाट समतोल घडवू शकतो. जागतिक हवामान बदलाला सामोरे जाण्यात पश्चिम घाट उत्तम भूमिका पार पाडू शकतो; मात्र त्याला आणि तिथल्या जैवविविधतेलाच धोका निर्माण झालेला आहे.
हवामान बदलांकडे डोळसपणे पाहा:यासंदर्भात आयआयटी मुंबईचे मुख्य संशोधक पेन्ननचेन्नन सामी 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना म्हणाले की, ताबडतोब शासन आणि समाज यांनी एकत्र आलं पाहिजे. पश्चिम घाटांमधील जमिनीची होणारी धूप थांबवली पाहिजे. त्यासाठी जमिनीच्या नुकसानीची माहिती वैज्ञानिकरित्या पडताळून पाहिली पाहिजे आणि त्या माहितीवर आधारित उत्तम व्यवस्थापनाचे आराखडे तयार केले पाहिजे. मानवाला विनाशकारी हवामान बदलापासून वाचवण्यासाठी पश्चिम घाट मोलाची भूमिका बजावू शकतो. अचानक डोंगर खचणे, माती खचणे हे वाचवायला हवे; अन्यथा मानवहानी मोठी होते. यावर पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत म्हणतात की, महाराष्ट्रात इर्शाळवाडी येथे डोंगर खचल्यामुळे जीवित हानी झाली. त्यामुळे हवामान बदलाकडे अत्यंत संवेदनशील नजरेनं पाहायला हवं.
हेही वाचा:
- मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करा - राम कदम यांचं ट्विट, तर मुनगंटीवार म्हणाले निरर्थक
- कराडच्या स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्तात जरांगे-पाटलांची सभा; उच्चांकी गर्दीचा अंदाज
- मध्य प्रदेश, छत्तीसगडचं भवितव्य मतपेटीत बंद, दोन्ही राज्यात विक्रमी मतदान