मुंबई -31 डिसेंबरला सुरक्षेच्या कारणास्तव उद्या दोन वाजल्यानंतर एकही बोट सुटणार नाही. कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय हातीसकर यांनी सांगितले की, 31 डिसेंबरला गेट वे ऑफ इंडिया तसेच ताज हॉटेल परीसरात नवीन वर्षाच्या स्वागताकरीता मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होत असते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता पोलीस प्रशासनाकडुन योग्य तो बंदोबस्त लावण्यात येतो. होणाऱ्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचे दृष्टीने जेट्टी क्रमांक ०१ ते जेट्टी क्रमांक ०४ वरील बोटी दुपारी 2 वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.
29 आरोपिंच्या मुसक्या आवळल्या-थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून ते आज 30 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजण्याच्यादरम्यान All Out Operation राबविण्यात आले होते. या ऑपरेशन ( All out operation campaign in Mumbai ) दरम्यान मुंबई पोलिसांनी वॉन्टेड, फरार अशा 29 आरोपिंच्या मुसक्या आवळल्या आहेत.
All Out Operation ची कार्यवाही - मुंबई शहरातील सर्व ५ ही प्रादेशिक विभगाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, १३ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा / सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आजपोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात All Out Operation वी कार्यवाही केली. पोलीस ठाणे, नाकाबंदी, कोबिंगस्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलीस आयुक्त यांनी मार्गदर्शन केले.
All Out Operation मध्ये पुढील कारवाई करण्यात आली -
1) मुंबई पोलीसांच्या रेकॉर्डवरील २९ पाहिजे/फरारी आरोपीतांना (Wanted / Absconder) अटक करण्यात आले आहे.
2) एकुण १३१ अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) ची बजावणी करून आरोपीतांना अटक करण्यात आली.
3) अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा (NDPS ACT) अन्यये एकुण १६४ कारवाया करण्यात आल्या.
4)अवैध शस्त्र (Illegal weapons) बाळगणाऱ्या एकुण ३१ कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली.
5) अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर ७३ ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. तसेच इतर अवैध ३८ धंदयावर छापे टाकुन ५५ आरोपीतांना अटक करण्यात आली.
6) मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने एकुण ६४ कारवाया करण्यात आल्या.
7) महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १२०, १२२ व १३५ अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण १४८ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर (Hawkars) एकुण ३५३ कारवाया करण्यात आल्या.
8) बृहन्मुंबई शहरात एकुण २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील १४७१ आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये २७१ आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
10) सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण १७८ ठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) लावण्यात आली होती. त्यामध्ये एकुण ८६९० दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम १८५ मोवाका अन्वये ६० वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली.
11) बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण ८७२ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.
12) प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे एकुण ५५५ तपासणी करण्यात आली आहे.