मुंबई-कोरोनाची दुसरी लाट राज्यात आणि शहरात आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अजूनही निर्बंध कायम आहे. मात्र, या निर्बंधावरती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केले आहे. दुकाने आणि आस्थापणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र, मुंबईतील काही भागात सायंकाळी चारनंतरही काही दुकाने खुलेआम सुरू असल्याचे पाहायला मिळते. ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून हफ्ता वसूल केला जात असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम; मनसेचा आरोप
मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
वसूलीचे नवे रेट कार्ड
संदीप देशपांडे यांनी दादर स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ ट्वीट करत सरकावर टीका केली आहे. ”आधी वसुली बार मालकांकडून..आता वसुली व्यापाऱ्यांकडून…! मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. सायंकाळी चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान ५०००, मध्यम दुकान २०००, छोटे दुकान १००० वसुली केली जात आहे. त्यामुळे वसूलीचे नवे रेट कार्ड असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
संध्याकाळपर्यंत दुकान उघडे ठेवण्याची परवानगी
आज व्यापारी अतिशय संकटात आहे व्यापार बुडालेला आहे. अशा परिस्थितीत दुकानांना अर्धवट दुकाने चालू ठेवायला सांगून त्यांच्याकडून खुलेआम हप्ते वसुली करणे, असे प्रशासनाचे काम सध्या सुरू आहे. आगोदरच व्यापारी संकटात सापडला आहे वरून त्यांच्याकडून हप्तेखोरी सुरू असेल तर यासाठी निर्बंध ठेवले आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. त्यापेक्षा तुम्ही दुकानदाराने संध्याकाळपर्यंत दुकान उघडे ठेवण्याची परवानगी द्या जेणेकरून या हफ्तेखोरीला आळा बसेल असेही देशपांडे म्हणाले.