मुंबई - राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्यासाठी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांचे समीकरण जुळण्याच्या तयारीत असतानाच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची पहिली बैठक रद्द झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, पुन्हा बैठक सुरू झाली.
सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची पहिलीच बैठक निश्चित झाली होती. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल यासाठीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सिल्वर ओक बंगल्यावर शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांची ही भेट तब्बल २० मिनिटांपेक्षा अधिक काळ चालली. या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? हे अद्याप बाहेर आले नसले, तरी अजित पवार मात्र तावातावाने बाहेर आले होते. आजची बैठक रद्द झाली आणि मी बारामतीला चाललो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता बैठक सुरू झाली.