मुंबई : शिवसेनेचे आमचे सर्व सहकाही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहेत. आणि तेच आमचे ध्येय आहे. सध्या मालमत्ता आम्ही ताब्यात घेणार अशा बातम्या फिरत आहेत. मात्र, आम्ही बाळासाहेबांच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा सांगणार नाही असे म्हणत, आम्ही राज्याला पुढे नेऊ जाण्याचे काम करत आहोत. तसेच, ठाकरे गटाने त्यांची मालमत्ता मिळवण्यासाठी काय केले हे जनतेला माहीत आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष ठाकरेंना टोला लगावला आहे.
मोठा असो लहाण कारवाई होणार : कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल. मग ती व्यक्ती मोठी असो की लहाण त्याने काही फरक पडत नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. असे म्हणत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याच्याशी आमचा संबंध नाही असेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस : आमचे सरकार आल्यानंतर बंद पडलेले अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आणि आम्ही सातत्याने काम करत आहोत ते जनतेला काम दिसेल. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणुक आयोगावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोग ही संस्था स्वायत्त आहे. आणि जो काही निकाल आला आहे तो योग्यतेनुसार घेतलेला आहे. आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत असे म्हणत असले तरी त्यातील अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
अडीच वर्षाचा सत्ताकाळ गेला : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. हा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत राज्यात सत्तेवर आले. हातातोंडाशी असलेली सत्ता गमावणे भाजपच्या जिव्हारी लागले होते. ठाकरे यांच्या बदला घेण्यासाठी भाजपने अनेक रणनीती आखल्याचे बोलले जाते. अडीच वर्षाचा सत्ताकाळ गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार केले. शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना आमची असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
हेही वाचा :Shivsena Bhawan : शिवाई ट्रस्ट अन् शिवसेना भवन विरोधात तक्रार, ठाकरेंचे टेन्शन वाढणार?