मुंबई:मुंबईत ३० वर्षे खड्डेमुक्त राहतील असे रस्ते बनवू, असे राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ( We will make pothole free roads for 30 years ) आहे. या प्रकल्पांतर्गत दर्जेदार कामे व्हावीत यासाठी आम्ही उपग्रहाद्वारे या रस्त्यांच्या जीवनचक्रावर लक्ष ठेवू, असेही ते म्हणाले. मी किंवा मुख्यमंत्री कोणालाही बीएमसीला पैसे कमविण्याचे मशीन बनवू देणार नाही. असे फडणवीस म्हणाले.
अडीच वर्षांत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण : बीएमसीने केलेल्या विकासकामांच्या 'भूमीपूजन' कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत दर्जेदार कामे व्हावीत यासाठी सरकार या रस्त्यांच्या जीवन चक्रावर उपग्रहाद्वारे देखरेख ठेवेल. तत्पूर्वी, गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीच्या 'मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पा'चे लोकार्पण केले. लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण आणि खड्डेमुक्त केले जातील.
कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा : 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार (Samriddhi Highway Inauguration PM Narendra Modi) आहे. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी बैठक व्यवस्था व अन्य सुरक्षा व्यवस्थेचा पोलिसांकडून आढावा (DCM Devendra Fadnavis inspected AIIMS) घेतला. त्यावेळी त्यांनी अनेक मूद्द्यांवर भाष्य केले.
एम्स येथे एकाच वेळी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एम्स येथे एकाच वेळी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत. या ठिकाणच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ही उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणच्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्या दरम्यान ते वंदे मातरम एक्सप्रेसचा शुभारंभ, मेट्रोचा शुभारंभ, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, चंद्रपूर येथील सिपेट कॉलेजच्या इमारतीचा शुभारंभ, एम्समधील विद्यार्थ्यांची भेट, अनेक उपक्रमांचा शुभारंभ असे कार्यक्रमांचे स्वरूप (Samriddhi Highway Inauguration PM Narendra Modi) आहे.