मुंबई -राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. हा विजयोत्सव आम्ही आयोध्येत लाखो दिवे लावून साजरा करू, असा संकल्प उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील प्रचार सभेत केला.
कांदिवली येथे युतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत आदित्यनाथ बोलत होते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी उत्तर प्रदेशातूनच गागाभट्ट यांना बोलावले होते. 24 ऑक्टोबरला आयोध्येत आम्ही 5 लाख 51 हजार दिवे लावणार असून त्याच दिवशी हरियाणा आणि महाराष्ट्रामधील विजय आम्ही साजरा करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा