मुंबई- भाजपा नेते किरीट सोमैया हे वारंवार मुख्यमंत्री, शिवसेना व शिवसेना नेत्यांवर आरोप करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांची आरोपांची मालिका संपली की, आम्ही त्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परिवहनमंत्री व शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी म्हटले आहे.
किरीट सोमैयांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ - अनिल परब - किरीट सोमैया लेटेस्ट न्यूज
किरीट सोमैयांची आरोपांची मालिका संपल्यानंतर आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
त्यांच्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झाला नाहीत -
किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपाबाबत अनिल परब बोलत होते. त्यांना आरोप करण्याचे काम दिलेले आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यास आतापर्यंत केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाहीत. त्यांच्या आरोपाची मालिका पूर्ण होऊ दे, मग आम्ही उत्तर देऊ. ते जे काही आरोप करत आहेत, त्याला कोणताही आधार नाही. जे आरोप केले, त्याची उत्तरे आधीच दिलेली आहेत. ते सर्व आरोप बिनबुडाचे ठरलेले आहेत. शिळ्या कडीला ऊत देण्याचे काम सुरू आहे. दिवाळीचे दोन चार दिवस जाऊ देत, त्यानंतर आम्ही त्या आरोपांची शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परब यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका