मुंबई - राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी जाईल, असा कोणताही प्रश्न आणि त्यासाठीचा प्रस्ताव आमच्यापुढे नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे स्पष्ट केले. तसेच याबाबत आमच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे आम्ही सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
थोरात पुढे म्हणाले, राज्यात निवडणुका झाल्यानंतर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही उद्या (शुक्रवारी) आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी जाणार आहोत. निवडणुकीबद्दल माहिती आम्हाला देणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीची भेट घेत आहोत. मात्र, या भेटीत सेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.