मुंबई- नाईक कुटुंबियांनी आम्हला निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य दिले आहे. त्यानुसार आज मी आणि सागर नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही गणेश नाईकांचा आशिर्वाद घेतला आहे. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशावर बोलणे मला योग्य ठरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले संदीप नाईक यांनी सांगितले आहे.
नाईक साहेबांचा आशिर्वाद घेऊनच भाजपात -संदीप नाईक - Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासकामांनी मी प्रेरित झालो आहे. तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारे कार्य सर्वसमावेशक आहेत. त्यामुळे आम्ही भाजपात प्रवेश केले असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले आहे.
संदीप नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासकामांनी मी प्रेरित झालो आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारे कार्य सर्वसमावेशक आहेत. ते प्रत्येक घटकांना न्याय देत आहे. नवी मुंबई शहर एक वेगळे शहर आहे. विकासाच्या उद्देशाने व अनेक चांगले प्रकल्प राबवण्यासाठी, तसेच सर्व समाजघटकाचा विकास करण्यासाठी आम्ही आज भाजपमध्ये सहभागी झालो आहोत, असे नाईक म्हणाले.