मुंबई - महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीसाठी उद्या ११ वाजता राज्यपालांनी ( Governor ) विशेष अधिवेशन बोलावले आहे. एकीकडे १६ अपात्र आमदारांचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना अशा पद्धतीने अधिवेशन बोलावणे ही राज्यपालांची भूमिका संशयास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.
राज्यपालांची भूमिका संशयास्पद?
याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल महोदयांची भूमिका संशयास्पद आहे. या अगोदर सुद्धा आपण बघितल आहे की, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत भाजप नेते उच्च न्यायालयात गेले व उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांना फटकारले व त्यांच्याकडून २ लाख रुपये दंड सुद्धा घेतला. त्यानंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं व ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय प्रतिष्ठित आहे. अशात जेव्हा आम्ही १२ आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्यपालांना विचारलं, तेव्हा त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने यावर निर्णय घेता येत नाही असं सांगितलं. मग आता १६ आमदारांच्या अपात्र संदर्भामध्ये सुद्धा प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने राज्यपालांनी विश्वास दर्शक ठरावाची मागणी करणे हे संशयास्पद असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास?