मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला का? याची खात्री केली जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला हे कोडे आद्यपही उलगडलेले नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दुबईहून भारतात आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा आज(मंगळवार) सकाळी 7 वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली होती. मात्र, या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाला की, पूर्व आजारामुळे याची खात्री केली जात आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.