मुंबई: गेल्या महिन्यात भाऊंचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा (Belapur-Elephanta) मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवांचे उदघाटन झाले आहेत. उद्घाटनानंतर बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला (Water Taxi In Mumbai) पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत (Tourist response to taxi service) आहेत. अवघ्या २३ दिवसांत बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील सरासरी ८० हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या झालेल्या असून यामार्फत एक हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी प्रवासी केला आहे. विशेष म्हणजे शनिवारी- रविवारी सुट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली आहे. याशिवाय बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांचा प्रतिसाद बघताना आणखी काही या मार्गावर कंपन्या वॉटर टॅक्सी सेवा चालविण्यासाठी इच्छा असल्याची माहितीही सागरी महामंडळाचा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई ते बेलापूर मार्गावर प्रतिसाद नाहीभाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान चालणाऱ्या वॉटर टॅक्सीला मात्र, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २३ दिवसांत या मार्गावरून चालणाऱ्या वॉटर टॅक्सीतून शंभर पर्यटकांनी सुद्धा प्रवास केला नाही. त्यामुळे या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा बंद पडण्याचा मार्गावर आहे. या मार्गावरील पर्यटक आणि प्रवासी वाढविण्यासाठी सागरी महामंडळातील अधिकाऱ्यांनी बैठकांचे सत्र सुरु आहे. सागरी महामंडळाचा एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले की, वॉटर टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना भाऊंचा धक्कावर येण्यास वाहन मिळत नसल्याने भाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान चालणाऱ्या वॉटर टॅक्सी प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आम्ही वॉटर टॅक्सी चालविणाऱ्या कंपनीना भाऊंचा धक्क्यावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सुविधेसाठी ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा सूचना केल्या आहे. याशिवाय ग्रीन गेटपर्यत किंवा गेटवेपर्यत वॉटर टॅक्सी येण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी पोस्ट ट्रस्टचा अधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चा सुरु आहेत.
असे आहेत दर बेलापूर ते भाऊचा धक्का दरम्यान वॉटर टॅक्सीच्या एकेरी प्रवासासाठी प्रवाशांना ८२५ ते १२१० रुपये मोजावे लागतात. या प्रवासाचा कालावधी ३०मिनिटे असा आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का दरम्यान कॅटामरान बोटीने प्रवास करण्यासाठी २९० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचा कालावधी ५० मिनिटे असेल. म्हणजेच प्रवासाची २० मिनिटे वाचवायची असतील तर प्रवाशांना ५३५ ते ९२० रुपये अधिक मोजावे लागतील. बेलापूर ते एलिफंटा वॉटर टॅक्सीच्या एकेरी फेरीसाठी प्रवाशांना ८२५ रुपये मोजावे लागते.
बेलापूर-एलिफंटा मार्गाला पसंती का ?५६ आसनी वॉटर टॅक्सीला बेलापूर ते भाऊचा धक्कापर्यतच्या एका फेरीस २२ ते २५ हजार रुपयांचे डिझेल लागते. याशिवाय तिकिट विक्री, नाविक आणि इतर असे मिळून सेवा सुरळीत ठेवण्यासाठी लागणाऱ्या एकूण १० कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कंपनीला अधिकचा खर्च करावा लागत आहे. एवढा सर्व खर्च केल्यानंतर फेरीस फाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला, तरीही २९० रुपये तिकिट असल्याने शासनास लेव्ही जमा केल्यानंतर जेमतेम १ ते २ हजार रुपये कंपनीच्या शिल्लकीत उरणार आहेत. त्यामुळे ही सेवा चालवणे कंपनीच्या फायद्याचे नाही. या उलट बेलापूर ते एलिफंटा मार्गावर वॉटर टॅक्सीला सुमारे १५ हजार रुपयांचे डिझेल लागेल. त्यामुळे डिझेलच्या माध्यमातून सरासरी १० हजार रुपयांचा खर्च कमी होईल. सर्वसामान्य प्रवाशांना २९० रुपये तिकीट आकारत असताना पर्यटनासाठी तिकिटाची किंमत वाढवली, तर बेलापूर-भाऊचा धक्का मार्गाहून अधिक नफा बेलापूर-एलिफंटा मार्गावर कमावण्याची संधी कंपनीस मिळणार आहे.