मुंबई - सुमन नगर जंक्शन जवळ १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे. महानगरपालिकेतर्फे ही गळती बंद करण्याचे काम ११ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी ए, ई, बी, एफ उत्तर, एफ दक्षिण, एम पश्चिम आणि एम पूर्व या विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, १२ नोव्हेंबर रोजी या विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.
गळती बंद करण्याचे काम सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्ये हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी या कामाच्या आधीच्या दिवशी म्हणजेच, १० नोव्हेंबर व ११ नोव्हेंबर रोजी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा. तसेच, नागरिकांनी दोन्ही दिवशी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.
...या विभागात होणार पाणी बंद
एम पूर्व - ट्राँबे निम्नस्तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्या नगर, म्हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्णू नगर, प्रयाग नगर आणि गवाण पाडा.
एम पश्चिम - साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी, पोस्टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्हैसूर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॅम्प, तसेच चेंबुर नाका ते सुमन नगर मधील सायन-ट्रॉबे मार्गालगतचा भाग.