महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवार-बुधवार दोन दिवस 'एस' विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद - मुंबई एस विभाग पाणीपुरवठा न्यूज

९ व १० डिसेंबरला ४ किलोमीटर लांबीची व १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे दोन दिवस मुंबईच्या एस विभागात पाणी पुरवठा केला जाणार नाही. याशिवाय ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’, ‘एल’ व ‘जी उत्तर’ या ४ विभागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

water Tap
पाण्याचा नळ

By

Published : Dec 8, 2020, 7:30 AM IST

मुंबई - महानगरपालिका भांडुप 'एस' विभागातील ४ किलोमीटर लांबीची आणि १ हजार ८०० व्यासाची 'तानसा' जलवाहिनी बदलण्याचे काम आज (मंगळवार ९ डिसेंबर)ला हाती घेणार आहे. त्यामुळे एस वॉर्डातील काही भागातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, तसेच पाणी जपून वावरावे, असे आवाहन जलविभागाने केले आहे.

मुंबईला नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिका जल अभियंता व पाणीपुरवठा प्रकल्प खाते अहोरात्र झटत असतात. जुन्या व कालबाह्य होणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतले जाते. तसेच नवीन जलवाहिनी कार्यान्वित करताना गरजेनुसार योग्य त्या आकाराची असेल याचीही काळजी घेतली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने जलवाहिनी दुरुस्ती व बदलाचे कामे करण्यात येतात. या अंतर्गत येत्या ९ व १० डिसेंबरला ४ किलोमीटर लांबीची व १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळी जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. नवीन जलवाहिनी २ हजार ४०० मिलीमीटर व्यासाची आहे. या कामासाठी पालिकेच्या ‘एस’ विभाग क्षेत्रातील काही परिसरात ९ व १० डिसेंबर २०२० रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तर याच दोन दिवशी ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’, ‘एल’ व ‘जी उत्तर’ या ४ विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन आदल्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी बदलण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवारी (९ डिसेंबर) 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद -

  • डक लाईन (खिंडीपाडा पंप क्षेत्र एस एक्स - १५) – दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
  • राजाराम वाडी, श्रीराम पाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स -७) - पहाटे ५ ते सायं. ५ वाजेपर्यंत.
  • खिंडीपाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स -०७) - पहाटे ५ ते सायं. ५ वाजेपर्यंत.
  • टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, (भांडूप पश्चिम क्षेत्र, टेंभीपाडा पोलिस चौकी एस एक्स ३) - पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत
  • जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा (फिल्टरपाडा एस एक्स-६) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास पाणी राहणार बंद.
  • आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स-०७) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास पासपोली गाव, मोरारजी नगर (मोरारजी नगर, पासपोली गाव, दरगाह एस एक्स-०५) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास.
  • गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर (एस एक्स-१०) – दु. १ ते दुस-या दिवशी स. ९.३० वाजेपर्यंत

‘के पूर्व’ विभागातील 'या' भागात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा -
(दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत)

  • चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, (मरोळ बस बार क्षेत्र, केई-०१) दु. २ ते सायं. ५.३० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
  • कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, (साहर रोड क्षेत्र, केई-०१) – दु. २ ते सायं. ५.३० वाजेपर्यंत.
  • ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी (पाईपलाईन परिसर) (ओम नगर परिसर, केई-०२) - पहाटे ५.०० ते स. ८.०० पर्यंत
  • विजय नगर मरोळ परिसर, (केई-१०ए) – सायं. ६ ते रात्री १० पर्यंत.
  • सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर – २४ तास या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

‘एच पूर्व’ विभाग

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एल’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नावे -

कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन या ठिकाणी पहाटे ५ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

‘जी उत्तर’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नावे

  • धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग (सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत)
  • धारावी सकाळचा पाणीपुरवठा (पहाटे ०४ ते दुपारी १२) - प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details