महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निर्जळी ! दोन दिवस वांद्रे, धारावीत पाणीपुरवठा बंद, 'हे' आहे कारण - पाणी पुरवठा बंद

पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

धारावीत पाणीपुरवठा बंद

By

Published : Sep 12, 2019, 7:34 AM IST

Updated : Sep 12, 2019, 8:48 AM IST

मुंबई- महापालिकेतर्फे टीचर कॉलनी-सांताक्रूझ येथील 2 हजार 400 मिलिमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वांद्रे टर्मिनस ते धारावी परिसरात शुक्रवारी 12 सप्टेंबर सकाळी 11 वाजल्यापासून शनिवारी 13 सप्टेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा - पवईतील गणेश मंडळाने भरले, होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क

या दुरुस्तीमुळे पालिकेच्या एच पूर्व विभागातील वांद्रे टर्मिनस परिसर, जी उत्तर विभागातील धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए.के.जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड व दिलीप कदम मार्ग येथे शुक्रवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच प्रेम नगर, नाईक नगर, 60 फुटी रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फुटी रोड, एम. रोड, धारावी लुप रोड या परिसराला शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा - राधाकृष्ण विखे-पाटीलांसह 3 मंत्र्यांच्या मंत्रिपदासंदर्भातील शुक्रवारपर्यंत सुनावणी तहकूब

पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 12, 2019, 8:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details