महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Water Supply Cut : कुर्ला परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद - जलवाहिनीच्या कामामुळे

‘कुर्ला पश्चिम’ (Kurla West) येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर साकीनाका येथे झडपा बसविण्याचे काम मंगळवार, १० मे रोजी सकाळी १० पासून बुधवार११ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद (Water supply cut off in Kurla) राहणार आहे. तर काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे

Water supply cut
पाणीपुरवठा बंद

By

Published : May 9, 2022, 10:19 PM IST

मुंबई:जलवाहिनीच्या कामामुळे (Pipeline work) जरीमरी, शांती नगर, तानाजी नगर, श्री कृष्णा नगर , सत्या नगर पाईप लाईन मार्ग, वृन्दावन खाडी नंबर ३, आशा कृष्णा इमारत, अन्नासागर इमारत, तिलक नगर, साईबाबा कंपाऊंड , डी सिल्वा बाग, एल. बी. एस. नगर, शेठीया नगर, सोनानी नगर, महात्मा फुले नगर, बरेली मस्जिद परिसर, शिवाजी नगर, अंधेरी कुर्ला मार्ग, अनिस कंपाऊंड, अंबिका नगर, सफेद पूल, उदय नगर भागात १० रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत पाणीपुरवठा होईल आणि सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे (Water supply cut off in Kurla). ११ मे रोजी पाणीपुरवठा सकाळी १० पर्यंत होणार नसून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पाणीपुरवठा कमी दाबाने : काजूपाडा, बैल बाजार, नवपाडा, एल. बी. एस. मार्ग, सुंदरबाग, ख्रिश्चन गांव, न्यू मिल मार्ग, हलाव पूल, मसरानी गल्ली, ब्राह्मण वाडी इत्यादी - (सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान १० मे आणि ११ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


पाण्याचा आवश्यक साठा करा :या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दुरुस्तीच्या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details